esakal | नांदेड - हाथरस प्रकरणी मंगळवारी वंचितचे मानवी साखळी आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या घटनेविरोधात नांदेड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपापल्या भागांमध्ये जमेल तेवढी मानवी साखळी तयार करून या घटनेचा निषेध करावा आपल्या घरासमोर उभे राहूनही या घटनेचा निषेध करावा असे आव्हान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

नांदेड - हाथरस प्रकरणी मंगळवारी वंचितचे मानवी साखळी आंदोलन 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - उत्तर प्रदेशातील  हाथरस येथील घटनेचा निषेध सर्व स्तरातून होत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना निषेधाचे पत्र देऊन निषेध करण्यात आला आहे. पीडित तरुणीला न्याय मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत असून मंगळवारी (ता. सहा) ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यात मानवी साखळी आंदोलन छेडण्यात येणार आहे. 

मंगळवारी सकाळी दहा ते १२ या वेळात शारीरिक अंतर पाळून व हातात निषेधाचे फलक घेऊन या घटनेचा निषेध करण्यात येणार आहे. पीडित मुलीच्या कुटुंबांना संरक्षण देण्यात यावे. शासकीय मदत देण्यात यावी, घटनेतील आरोपींना कडक शासन व्हावे, आदी मागण्या या वेळी करण्यात येणार आहेत. 

हेही वाचा- Video - नांदेडला काँग्रेसचा प्रतीकात्मक बैलगाडी लाँगमार्च ​

हाथरस घटना मानवतेला काळीमा फासणारी 

नांदेड येथे महात्मा फुले पुतळा परिसरातून आयटीआय चौक येथून ही मानवी साखळी सुरु होणार, असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही मानवी सगळी असणार आहे. दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता या आंदोलनाचा समारोप होणार आहे. हाथरस येथील घटना मानवतेला काळीमा फासणारी असून उत्तर प्रदेश सरकार व केंद्रातील सरकार या प्रकरणातील आरोपींना वाचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पीडित कुटंबाल धमक्या देण्यात येत असून या घटनेतील सत्य लपवण्यासाठी सरकार अतिशय खालच्या स्तरापर्यंत जात आहे. 

हेही वाचले पाहिजे- Video- सुट देऊन लुट करणे खादीच्या तत्वात बसत नाही : किनगावकर

निषेध करण्यासाठी मानवी साखळी तयार करुन सामिल होण्याचे आवाहन

त्यामुळे या कुटुंबाला व पीडित तरुणीला न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे. मंगळवारी होणाऱ्या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपापल्या भागांमध्ये जमेल तेवढी मानवी साखळी तयार करून या घटनेचा निषेध करावा आपल्या घरासमोर उभे राहूनही या घटनेचा निषेध करावा असे आव्हान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.