esakal | कर्जबाजारी ॲटो चालकाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लोहा तालुक्यातील पोखरी येथील ॲटो चालक गोविंद मनोहर ताटे (वय २६) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. यावर्षीही नापिकी असल्याने त्याने घरगाडा चालविण्यासाठी खासगी फायनान्सचे कर्ज काढले.

कर्जबाजारी ॲटो चालकाची आत्महत्या

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : सततची नापिकी व खासगी कर्जापायी एका ॲटो चालकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पोखरी (ता. लोहा) येथे शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 

लोहा तालुक्यातील पोखरी येथील ॲटो चालक गोविंद मनोहर ताटे (वय २६) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. यावर्षीही नापिकी असल्याने त्याने घरगाडा चालविण्यासाठी खासगी फायनान्सचे कर्ज काढले. परंतु शेतातील उत्पन्न घटल्याने काढलेल्या कर्जाची परतफेड ते वेळेत करु शकत नव्हता. प्रपंच चालविण्यासाठी त्याने ॲटो सुरु केला. परंतु तोही व्यवसाय चालत नसल्याने शेवटी तो हतबल झाला. शेवटी त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी सहाच्या सुमारास आपल्या घराच्या स्लॅबला नायलोनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती विक्रम ताटे यांनी लोहा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास हवालदार श्री. भूते करत आहेत.

हेही वाचा सावधान... नांदेडला वाहनांची होतेय चोरी; पोलिसांनी द्यावे लक्ष -

देवीदास फुलारी यांना नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचा कुसुमाग्रज काव्यप्रतिभा पुरस्कार

नांदेड - येथील साहित्यिक देवीदास फुलारी यांना पुणे येथील नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचा कुसुमाग्रज काव्यप्रतिभा पुरस्कार जाहीर झाला असून रविवार (ता. आठ) नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल. 

समाजाभिमुख काव्यप्रतिभेने बांधिलकी जपणाऱ्या कवीला हा पुरस्कार दिला जातो, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, ग्रंथभेट आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्रीमती कृष्णाबाई सुर्वे, डॉ. श्रीपाल सबनीस यांचे उपस्थितीत हा पुरस्कार देवीदास फुलारी यांना प्रदान करण्यात येणार आहे. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या वास्तव्याने पुणित झालेल्या नेरळ (नवी मुंबई) येथील त्यांच्या पवित्र वास्तुत हा सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर काव्यजागर हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वर्क्तृत्व आणि कर्तृत्वाने साहित्यिक चळवळीत सक्रिय असलेले देवीदास फुलारी यांनी कविता, कादंबरी, बालसाहित्य आणि समीक्षेच्या प्रांतात लक्षणीय लेखन केले आहे. त्यांच्या पाच आऱ्यांचे चाक ही कादंबरी, अक्षरनारायणी ही समीक्षा, राधा आणि कविता क्रांतीच्या या कवितासंग्रहास रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे. फुलारी यांच्या या योगदानाबद्दल त्यांना कुसुमाग्रज काव्यप्रतिभा या पुरस्काराने सन्मानित करत असल्याचे साहित्य कला अकादमीच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्रीमती कृष्णाबाई सुर्वे आणि अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी कळविले आहे.