कंधारमध्ये कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

शेतकऱ्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बाभूळगाव (ता. कंधार) शिवारात बुधवारी (ता. १७) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. 

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बाभूळगाव (ता. कंधार) शिवारात बुधवारी (ता. १७) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. 

कंधार तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकरी माधव संभाजी मुंडे (वय ५५) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. शेतातील उत्पन्न घटल्याने त्यांनी आपला घरगाडा चालविण्यासाठी बँकेचे कर्ज काढले. परंतु शेतात उत्पन्न होत नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढला. यातच मागील तीन महिण्यापासून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लावण्याता आलेल्या लॉकडाउनमुळे हाताला काम नाही. आता यावर्षी शेतात पेरणी कशी करायची, कर्जाची परतफेड कशी करायची आणि घरगाडा कसा चालवायचा या विवंचनेत असलेल्या माधव मुंडे यांनी बुधवारी (ता. १७) आपले शेत गाठले. शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

आत्महत्येची माहिती दुपारी त्याच्या घरच्या लोकांना समजली. त्यांनी शेताकडे धाव घेतली. माळाकोळी पोलिसांंना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी सरकारी रुग्णालयात पाठविले. गणपती माधव मुंडे यांच्या माहितीवरुन माळाकोळी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. कराड करत आहेत. 

हेही वाचा -  नांदेडच्या ‘या’ बँकेची निवडणूक पुढे ढकलली

दहा लाखासाठी विवाहितेचा छळ 

नांदेड : चैणीच्या वस्तु खरेदीसाठी माहेराहून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावून एका विवाहितेस सासरच्या मंडळीने त्रासुन सोडले. या प्रकरणी माहेरच्या मंडळीवर मनाठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील माहेरवासीन हिला लग्नानंतर सासरी काही दिवस चांगले नांदवले. त्यानंतर तिला किरकोळ कारणावरुन त्रास देणे सुरू केले. तसेच माहेरून चैनिच्या वस्तु खरेदी करण्यासाठी दहा लाखाची मागणी करुन तिचा शरिरीक व मानसिक छळ सुरू केला. एवढेच नाही तर तिच्या ताब्यातील मुलीला हिसकावून घेतले. या त्रासाला कंटाळून पिडीत विवाहितेने मनाठा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. जाणापूरे करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debt-ridden farmer commits suicide in Kandahar nanded news