महात्मा बसवेश्वरांच्या फलकाची विटंबना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Defamation of Mahatma Basaveshwar board citizens protesting

महात्मा बसवेश्वरांच्या फलकाची विटंबना

कंधार : उस्माननगर (ता.कंधार) येथे काही समाजकंटकांनी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी लावलेल्या फलकाची विटंबना केल्याने गावात तणाव निर्माण झाला. नागरिकांनी या घटनेच्या निषेधार्थ रास्तारोको केला. पंधरा दिवसातील ही दुसरी घटना होय. जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.

रात्री अज्ञात समाजकंटकानी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याच्या फलकाचे बॅनर फाडल्यामुळे गावामध्ये सकाळपासूनच तणावाचे वातावरण आहे. बस स्टँड येथील महात्मा बसवेश्वर चौकामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याची नियोजित जागा आहे. या ठिकणी पुतळ्याच्या नियोजित जागेचे फलक मागच्या दहा वर्षां पेक्षाही जास्त काळापासून उभे आहे. मंगळवारी सकाळी गावातील नागरिकांना फलकाची विटंबना झाल्याचे लक्षात आले. विटंबना झाल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी उस्माननगर बंदची हाक देत आंदोलनास सुरवात केली. काही क्षणात सर्व दुकाने बंद करण्यात आली.

आणि राष्ट्रीय महामार्ग ५० वर सकाळी सात वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. महापुरुषाचा वारंवार अवमान करणाऱ्यास त्वरित जेरबंद करा आणि यावर उचस्तरीय चौकशी नेमा अशा मागण्या गावकऱ्यांनी प्रशासन तथा पोलिस अधिकारी यांच्याकडे केल्या. आंदोलनामध्ये बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर, गोविंद पोटजळे, प्रसाद साखरे, संजीव वारकड, संजय वारकड, माधव मोरे, बालाजी ईसादकर, सुरेश ईसादकर, देविदास डांगे, बसवेश्वर वारकड, गुणाजी वारकड, प्रतीक विश्वासराव, व्यंकटराव पाटील घोरबांड, शामकांत शेकापुरे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

Web Title: Defamation Of Mahatma Basaveshwar Board Citizens Protesting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top