esakal | देगलूर- बिलोली विधानसभेसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग
sakal

बोलून बातमी शोधा

देगलूर पोटनिवडणूक

देगलूर- बिलोली विधानसभेसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिकाम्या झालेल्या देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघात पोट निवडणुकीचे वेध लागले आहेत. काँग्रेसकडून दिवंगत आमदार अंतापूरकर यांचा मुलगा जितेश यांच्या नावाची चर्चा आहे. तर, भाजपसह कॅांग्रेसच्या काही उत्साही स्वयंघोषीत नेत्यांनी पक्षश्रेष्ठीकडे उमेदावारी मागणी करुन मतदार संघात अनेकांनी आपला तळ ठोकला आहे.

देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप या प्रमुख पक्षांसह वंचित आणि डाव्या पक्षानेदेखील कंबर कसली आहे. दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या अकाली निधनानंतर विधानसभेची जागा रिकामी झाली आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गावोगावी लोकांच्या भेटी- गाठींवर भर देण्यात येत आहे. देगलूर- बिलोली मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघावर अनेक वर्षे काँग्रेसचेच वर्चस्व राहिले.

हेही वाचा - ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात' सात वर्षांमध्ये मोदी सरकारने कसं काम केलंय आणि तुम्हाला या सरकारबद्दल नक्की काय वाटतंय?

जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिवंगत आमदार अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश यांना युवक काँग्रेसचे सरचिटणीस नियुक्त करून त्यांना आगामी निवडणुकीसाठी लाँच केल्याची चर्चा आहे. तर, भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंडखोरीच्या वृत्ताने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे बॅकफूटवर गेल्याचे सांगण्यात येते. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत, रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणे यांचा पराभव करत देगलूर- बिलोलीची जागा काँग्रेसकडे खेचून आणली होती. सध्या विधानसभेची जागा काँग्रेसकडे असल्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांची मोठी कोंडी झाली आहे. तर, माजी आमदार साबणे यांनी ही जागा सेनेला मिळाली नाहीतर पंढरपूरच्या निकालाची पुनरावृत्ती होईल, असे वक्तव्य केले होते.

देगलूर- बिलोली मतदारसंघात जातीचे समीकरण महत्वाचे आहे. मागासवर्गीय मतांच्या जोरावर उमेदवार विजय मिळवू शकतो. असे असले तरीही पक्षीय जुळवाजुळव आणि जनसंपर्काचाही मोठा फायदा इथे मिळण्याची शक्यता आहे. देगलूर येथे अनेक वर्ष अध्यापन करत सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या प्रा. उत्तमकुमार कांबळे यांनी जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे उमेदवारी मागितली आहे. आपल्याला माजी विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांचा पाठिंबा असल्याचे बोलल्या जाते.

यासोबतच माजी जिल्हा परिषद सदस्य निवृत्ती कांबळे यांच्याकडे ग्रामीण भागातील जनसंपर्क आहे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे त्यांना मार्गदर्शन असल्याचीही चर्चा आहे. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आलेल्या निवृत्ती कांबळे यांना निवडणूक लढविण्याचा दांडगा अनुभव आहे. नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष धोंडिबा कांबळे देखील इच्छुकतर, देगलूर नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष धोंडिबा कांबळे यांनीही भाजपकडे तिकीट मागितल्याचे बोलल्या जात आहे. अनेक वर्षे देगलूर शहरातील समस्या सोडवण्यात आपल्याला यश मिळाले, यापुढे विधानसभा मतदारसंघातील समस्या सोडविण्यावर भर देऊ, असाही त्यांचा दावा आहे.

येथे क्लिक करा - इच्छुक व पात्र उमेदवार माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भाजपचे पदाधिकारी मारोती वाडेकर यांना यापूर्वी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे. मतदारसंघातल्या विविध प्रश्नांची जाण आणि मोठ्या जनसंपर्काच्या आधारावर आपण विजयी होऊ, असे वाडेकर सांगतात. भाजप वरिष्ठांकडे उमेदवारी मगितली आहे. मी भाजप पक्षाशी बांधील आहे. निश्चितपणे पक्ष माझ्या कार्याची दखल घेईल. निवडणुका येतील जातील, मात्र मी पक्षासोबत राहील, असे देखील त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडी देखील मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे. मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. त्यासाठी मतदारांचे मत जाणून घेतले जात आहे. मतदारसंघात अनुसूचित जाती जमाती मतदार संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. योग्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली तर या मतदारांचा वंचित बहुजन आघाडीला फायदा होऊ शकतो.

देगलूर बिलोली मतदारसंघाचे जातीय समीकरण

लिंगायत - 45 हजार

बौद्ध - 44 हजार

धनगर - 35 हजार

मुस्लीम - 40 हजार

मातंग - 31 हजार

मराठा - 32 हजार

गोलेवार - 15 हजार

हटकर - 15 हजार

इतर - 58 हजारएकूण

3 लाख 15 हजार इतके मतदान आहे.

तीन दशकांपासून सिंचनाचा प्रश्न प्रलंबित

देगलूर-बिलोली मतदारसंघातील समस्यादेगलूर-बिलोली मतदारसंघात मागच्या तीन दशकांपासून सिंचनाचा प्रश्न प्रलंबित आहे. देगलूर येथील लेंडी प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पांतर्गत दोन्हीही तालुक्यातील शेती आणि अनेक गावांना पाणी मिळणार आहे. करडखेड तलावाचा प्रश्नही अजून प्रलंबित आहे. या मतदारसंघात दोन्ही तालुक्यात एमआयडीसी विकसित झालेली नाही, त्यामुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळत नाही.