दिव्यांगांच्या राखीव निधीवर समाजकल्याण विभागाचा डल्ला 

file photo
file photo

नांदेड : एकिकडे शासन स्तरावरून दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना व वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. तसेच दिव्यांगांचे पूनर्वसन व्हावे यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाकडील एकुण स्वउत्पनातुन सुरूवातीला तीन टक्के आणि आताचा सुधारीत पाच टक्के निधी दरवर्षी राखीव ठेऊन त्याच त्या वर्षी खर्च करणे बंधनकारक आहे. तसेच या संदर्भात उच्च न्यायालयाची रिट याचीका ११८/२०१० नुसार सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे.

दिव्यांगांचा या निधी खर्चाबाबत बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी गत अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने विविध आंदोलने, उपोषणे करून सुद्धा हा निधी पुर्णतः का खर्च केला जात नाही यासंदर्भात आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली. यावेळी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेडकडुन सर्व शासन निर्णयांना आणि आदेशांना केराचीच टोपली दाखविली असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ती बाब म्हणजे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषदकडुन दिव्यांगांसाठी वापरण्यात येणारा निधी 

वापरण्यात आलेला व शिल्लक निधीचे आकडे बोलतात

सन २०११-१२ मध्ये २०, ५९, ८२,५४९ तर शिल्लक १, २८, ४४, २०८.
सन २०१२- १३ मध्ये २३,३४,३०,७३९ तर शिल्लक २, ६८, ३६, १५३, 
सन २०१३-१४ मध्ये ११, २१, ३६, ३५६ तर शिल्लक १, ६२, १४, ७८७
सन २०१४-१५ मध्ये १, ७९, ९९, ०८२ तर शिल्लक ३८,११,०३७
सन २०१५-१६ मध्ये २, २४, ०३, ३८१ तर शिल्लक ६४, १८, ४८८
सन २०१६-१७ मध्ये ६, ९०, ९९, ३३६ तर शिल्लक ६८, ९७, १०४
सन २०१७-१८ मध्ये ३, ९२, ५४, ५८९ तर शिल्लक ७४, ६८, ८८६
सन २०१८-१९ आणि २०१९-२० या वार्षिक वर्षाच्या लेखे अंतीम निर्णय करणे अद्याप बाकीच आहे.

ही बाब लपविण्यासाठी दिव्यांग मित्र अॅपचे चित्र पुढे

अशा प्रकारे गत अनेक वर्षांपासून दिव्यांगांच्या राखीव निधी खर्चात जिल्हा परिषदकडुन डल्ला मारला जात असल्याचे आणि ही बाब लपविण्यासाठी दिव्यांग मित्र अॅपचे चित्र पुढे करून जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांची दिशाभुल केली जात असल्याचा आरोप राहुल साळवे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com