esakal | नांदेडचे जिल्हाधिकारी थेट मुगाच्या खळ्यावर, कशासाटी? ते वाचाच  
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

सध्या पाऊस समाधानकारक झाल्याने व पिके जोरात अल्याने शेतकरी चांगलाच सुखावला आहे. मुग, उडीद, सोयाबिन पीकाची कापणी सध्या सुरु आहे. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना देखील शेताच्या बांधावर जाण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी थेट मुगाच्या खळ्यावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

नांदेडचे जिल्हाधिकारी थेट मुगाच्या खळ्यावर, कशासाटी? ते वाचाच  

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - पेशाने डॉक्टर असलेले नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे शहरासह जिल्ह्यातील तालुका आणि गाव पातळीवर सुरु असलेल्या घडामोडीवर देखिल तितकेच बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यामुळेच डॉ. इटनकर यांनी नुकतेच धर्माबाद तालुक्याच्या दौऱ्यावर असताना अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या विशेष म्हणजे तूप्पा येथील शेतकरी मारोती शिंदे यांच्या शेतात सुरु असलेल्या मूग पीक कापणी प्रयोगास भेट देखिल त्यांनी भेट दिली.

पुढे शेतकऱ्यांच्या बाधावर उपस्थित असलेल्या अनेक शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे व हवामानाचा अभ्यास करुन पिक पाणी घेतल्यास शेतकऱ्यांना वादळवाऱ्याच्या नुकसानीपासून पिकांचा बचाव करता येऊ शकतो आणि होणारे नुकसान देखील टाळता येणे शक्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला.  

हेही वाचा- नांदेडला रविवारी मोठा धक्का, ३०१ जण पॉझिटिव्ह; १२९ कोरोना मुक्त, पाच रुग्णांचा मृत्यू ​

मत्स्यपालन, शेडनेट गुलाब लागवड, फुल शेतीची पहाणी

मुगाच्या खळ्याची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पुढे नायगाव तालुक्यातील गोळेगावला येथे देखील बापुराव वाघमारे यांच्या शेतातील  मत्स्यपालन, शेडनेटमधील गुलाब लागवड, फुल शेतीला भेट देऊन पाहणी केली. श्री वाघमारे या शेतकऱ्याने केलेली अधुनिक शेती बघुन जिल्हाधिकारी यांनी बापुराव वाघमारे यांचे कौतुक केले. भविष्यात शेती करण्यासाठी अशा पद्धतीचे प्रयोगात्मक शेती करण्यावर तरुण शेतकऱ्यांनी भर द्यावा. त्या शिवाय शेतीमध्ये पुढे जाता येणार नाही असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा- नांदेडच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांनी चालवली सायकल...काय होते निमित्य...

शेतीपूरक जोडव्यवसाय कारावा

वाघमारे या शेतकऱ्याला शेततळ्यातील मत्स्यपालनातुन एक लाख रूपयाचे उत्पन्न झाले आहे. आणखी एक लाख अपेक्षित आहेत. शेडनेटमधील फुल उत्पादनातुन जवळपास दोन लाख उत्पन्न झाले आहे. त्यांना केवळ तीन एकर शेती आहे. शेतकऱ्यांची शेती करण्याची पद्धत बघुन जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले व इतर शेतकऱ्यांनी देखील शेततळ्यात मत्स्य उत्पादन व इतर शेतीपूरक जोडव्यवसाय करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.