नांदेडच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांनी चालवली सायकल...काय होते निमित्य... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेडच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांनी चालवली सायकल.

हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस ता. २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने नांदेडला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह उपस्थित अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सायकल चालवली.

नांदेडच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांनी चालवली सायकल...काय होते निमित्य...

नांदेड - चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली ही शरिराला मिळणाऱ्या व्यायामात दडलेली असते. हे लक्षात घेता चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास स्वत:च्या आरोग्यासाठी देऊन जमतील तसे खेळ खेळणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शनिवारी (ता. २९) सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासह उपस्थित अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सायकल चालवली.

कोरोनाच्या वातावरणात प्रत्येकाला आपल्या घराच्या परिसरात असलेल्या जागेवरही आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम करता येऊ शकतो, असेही डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले. हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस ता. २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने नांदेडला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले.

हेही वाचा - नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून प्लाझ्मा थेरपी उपचार सुरु 

‘फिट इंडिया फ्रीडम रन’ उपक्रम 
या कार्यक्रमासाठी महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, शिवछत्रपती पुरस्कारार्थी रामलु पारे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी जनार्धन गुपीले, नांदेड सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष निखील लातुरकर, डॉ. पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार आदी उपस्थित होते.  
नवी दिल्ली युवा व खेल मंत्रालयांनी ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ हा उपक्रम देशभरात राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यामार्फत राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्हयात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

जिल्हाधिकारी, आयुक्तांनी चालवली सायकल
त्यानुषंगाने नांदेड जिल्हयात “फिट इंडिया फ्रीडम रन” हा उपक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नांदेड जिल्हा सायकलिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करुन फिट इंडिया फ्रीडम रन या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते “फिट इंडिया फ्रीडम रन” फ्लेक्सचे रिबीन कापून शुभारंभ करण्यात आला. या सायकल रॅलीमध्ये स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याबरोबर शासकीय अधिकारी, कर्मचारी व सायकलपटू यांनी सहभाग घेतला.

हेही वाचलेच पाहिजे - Video- उद्धवा, आता तरी उघड मंदिराचे दार; नांदेडमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन 

क्रीडा अधिकारी कार्यालयात समारोप
या रॅलीचा शुभारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथून जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल-आयटीएम कॉलेज-आयटीआय-श्रीनगर-वर्कशॉपकॉर्नर-भाग्यनगररोड-आनंदनगर-वसंतराव नाईक चौक (नागार्जुना)-अण्णाभाऊ साठे चौक-व्हीआयपी रोड-आयटीएम मार्गे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम सामाजिक अंतराचे पालन करुन यशस्वी करण्यात आला. या क्रीडा अधिकारी किशोर पाठक यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर गुरुदिपसिंघ संधु यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, वरिष्ठ लिपीक आनंद गायकवाड, स्टेडीयम व्यवस्थापक रमेश चवरे, सायकलींग संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर सोनसळे व त्यांचे सहकारी आणि संजय चव्हाण आदींनी सहकार्य केले.

Web Title: District Collector Nanded Commissioner Rode Bicycle What Was Occasion Nanded News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nanded