शिष्यवृत्तीसंदर्भात एसएफआयचे जिल्हाभरात आंदोलन

nanded news
nanded news

नांदेड  : विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर शिष्यवृत्तीचे त्वरित वितण करण्याच्या मागणीसाठी स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) राज्य कमिटीने दिलेल्या हाकेनुसार सोमवारी (ता. एक) जिल्हाभरात शारीरिक अंतर ठेवून आंदोलन करण्यात आले.

कोरोना महामारीचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे राज्यातील जनतेला भयंकर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. या संकटावर मात करण्यासाठी सरकार व आरोग्य व्यवस्था संपूर्ण प्रयत्न करत आहेत. वाढत्या संक्रमनामुळे या महामारीला आटोक्यात आणण्याचे खूप मोठे आव्हान सर्वांसमोर उभे आहे. या महामारीने लाखो कुटुंबांच्या हातातले काम हिरावून घेतले. शेतकरी, शेतमजूर, कामगारांसमोर राजगारासह उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. यासह सर्वक्षच क्षेत्राला फटका बसला आहे.

विद्यार्थ्यांवर देखील या महामारीचा वाईट परिमाण झालेला आहे. शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी राज्यात, देशात आणि परदेशात अडकून पडले आहेत. काही विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोच करण्यात आले असले तरी अजूनही बरेच विद्यार्थी अशाच अडचणीत आहेत. लॉकडाऊनमुळे यंदा थोडे लवकरच शैक्षणिक वर्ष २०१९-२० हे साल संपले आहे. अशा संकटाच्या काळात राज्यातील सर्वच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना आतापर्यंत त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळणे अपेक्षित होते. परंतु आजपर्यंत देखील राज्यातील हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.

शैक्षणिक वर्षाच्या शेवटपर्यंत शिष्यवृत्ती न मिळणे, ही खूपच निंदाजनक बाब आहे. इतर कर्तव्ये पार पडताना सरकारने शिष्यवृत्ती वितरीत करण्याच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे गंभीर आहे, त्याबरोबरच स्वाधारची रक्कम त्याचबरोबर बार्टी अंतर्गत मिळणाऱ्या 308 विद्यार्थ्यांना फेलोशीपची रक्कम तात्काळ अदा करण्याच्या मागणीला घेऊन आज आंदोलन करण्यात आले. यापूर्वी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री  धनंजयजी मुंडे यांनी अगोदरच जाहीर केले होते की, शिष्यवृत्ती आणि फेलोशीपच्या रकमा तीन ते चार दिवसात सर्व विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ट्विट दस्तूरखुद्द त्यांच्या खात्यावरून टाकण्यात आले होते.प्रत्यक्षात मात्र पोकळ घोषणाच म्हणून समोर आलेली आहे.

याच्या निषेधार्थ आज सबंध राज्यभर शारीरिक अंतर ठेवून विद्यार्थी आंदोलन करण्यात आले. सरकारने आंदोनाची दखल घेवून तात्काळ मागणी पुर्ण करावी अन्यथा संघटनेच्या वतिने एसएमएस आणि ट्विटर आंदोलन करण्यात येईल. मागणीचा गांभीर्याने विचार करून शिष्यवृत्तीच्या रक्कमेबरोबरच इतर मागण्यमान्य कराव्यात आक्रमक आंदोलन छेडण्याचा ईशारा संघटनेचे राज्याध्यक्ष बालाजी कलेटवाड, जिल्हाध्यक्ष विजय लोहबंदे, जिल्हा सचिव विकास वाठोरे, मीना आरसे, विशाल भद्रे, शंकर बादावाड, रत्नदीप कांबळे, स्वप्नील बुक्तरे, प्रफुल्ल कौडकर, अमोल सोनकांबळे, सुधाकर आंबुलगेकर, जयपाल शिरसाठे, मालेमा आरसे आदींनी या वेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com