नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे द्विशतक

शिवचरण वावळे
Monday, 3 August 2020

तसेच चौघांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान, दिवसभरात ६६ जण कोरोनामुक्तही झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

नांदेड : कोरोना बाधितांचा सोमवारी (ता. तीन) सर्वोच्च आकडा झाला. तब्बल २०३ अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच चौघांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली. दरम्यान, दिवसभरात ६६ जण कोरोनामुक्तही झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. रविवारी (ता. दोन) घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी सोमवारी (ता. तीन) सायंकाळी एक हजार १०६ स्वॅब अहवाल प्राप्त झाले. यात ८५४ अहवाल निगेटिव्ह व २०३ स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले. दुसरीकडे चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सोमवारी देखील २०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले

मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी देखील २०३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामुळे जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या दोन हजार ३५९ वर पोहचली आहे तर ६६ बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत एक हजार २० रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

हेही वाचा‘मी आणि तुम्ही आहात’ असे कोण कोणास म्हंटले...? वाचा सविस्तर ​

चौघांचा उपचारा दरम्यान मृत्यू

उपचार सुरु असलेल्या पन्नास वर्षापुढील दोन पुरुष व दोन महिलांचा सोमवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने मृत्यूचा आकडा ९४ इतका झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी सांगितले. सोमवारी मृत्यू झालेल्या रुग्णामध्ये देगलूर येथील महिला (वय ७२), नांदेडच्या चौफाळा येथील पुरुष (वय ६५), नाटकार गल्ली देगलुर येथील पुरुष (वय ५६), फुलेनगर कंधार महिला (वय ६५) यांचा समावेश होता. यातील तीन रुग्णांवर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात तर एका रुग्णावर श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक शासकीय जिल्हा रुग्णालय उपचार सुरु होते.

येथे क्लिक करा - नांदेड : शहर वाहतुक शाखेतील महिला पोलिसांचा वाहनधारकांना मनस्ताप

अजून ४७ स्वॅब अहवालाची प्रतिक्षा

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना शोधुन त्यांची आरटीपीसीआर व अँन्टीजेन पद्धतीने स्वॅब घेतले जात आहेत. त्यामुळे तपासलेल्या स्वॅबचा अहवाल अगदी काही तासात मिळत असल्याने यात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. सोमवारी आरटीपीसीआरद्वारे १२४ तर अँन्टीजेन तपासणीतून ७९ असे एकुण २०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. सध्या उपचार सुरु असलेल्या बाधित रुग्णांपैकी सात महिला व १२ पुरुषांची प्रकृती गंभीर असून अजून ४७ स्वॅब अहवाल येणे बाकी आहेत. मंगळवारी (ता. चार) सायंकाळपर्यंत त्यांचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.  

तालुकानिहाय सोमवारी सापडलेले रुग्ण
नांदेड शहर - ५८
अर्धापूर - तीन
भोकर- दोन
बिलोली- १७
देगलुर- १९
धर्माबाद - पाच
हदगाव- २६
कंधार- एक
नांदेड ग्रामीण - दोन
किनवट - १४
मुखेड- १३
नायगाव- २९
उमरी- ११
परभणी - दोन
यवतमाळ - एक
एकुण - २०३

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Double century of coronary heart disease patients in Nanded district nanded news