esakal | Video - डॉ. शंकरराव चव्हाण यांचा गौरवग्रंथ ठरणार प्रेरणादायी, कसा? ते वाचाच  
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

प्रदीर्घकाळ म्हणजे तब्बल पाचदशके राजकारणात राहिलेल्या डाॅ. शंकरराव भाऊराव चव्हाण यांच्या जीवनातील असे वेगवेगळे प्रसंग, चढ-उतार हा सारा ऐवज त्यांच्या चाहत्यांना-वाचकांना लवकरच एका गौरवग्रथांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

Video - डॉ. शंकरराव चव्हाण यांचा गौरवग्रंथ ठरणार प्रेरणादायी, कसा? ते वाचाच  

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : राज्याचे दोनवेळा मुख्यमंत्रिपद तसेच केंद्रात विविध खात्यांची मंत्रिपदे भूषविल्यानंतर नांदेड नगरीतून पुढे गेलेल्या या शिस्तप्रिय-कणखर नेत्याची जीवनयात्रा २००४ च्या फेब्रुवारीमध्ये थांबली. त्यानंतर त्यांची स्मृति जपण्याचे उपक्रम साजरे होत असताना, गेल्यावर्षी १४ जुलैपासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु असून त्याची सांगता पुढील महिन्यात १३ तारखेला होत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात भरीव योगदान देणाऱ्या शंकररावांचा जीवनप्रवास ‘जलशंकर’ या चरित्रातून यापूर्वीच वाचकांसमोर आला होता. त्याचे लेखन करणारे लेखक डाॅ. सुरेश सावंत यांच्यावरच शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी गौरवग्रंथाच्या संपादनाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने सोपविली. कोरोनाकालीन टाळेबंदीच्या अस्वस्थ, अनिश्चित काळात त्यांनी विविध क्षेत्रांतील शंकररावांचे परिचीत, तसेच लेखक, पत्रकार, राजकारणी आणि दिवंगत नेत्याचे आप्त अनेकांना लिहिते करून आधुनिक भगीरथ या सुमारे ६०० पृष्ठांच्या ग्रंथाची मुद्रणप्रत अंतिम टप्प्यात आणली.  

हेही वाचा - म्हणून मी बहिणीला मारले; भावाने केला खुनाचा उलगडा -

विविध पैलुंवर प्रकाश टाकणारा मजकूर
शंकररावांची राजकीय कारकीर्द १९५२ मध्ये नांदेडच्या नगराध्यक्षपदापासून सुरु झाली. मग उपमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा तिचा व्यापक विस्तार झाला. या सत्ताकाळात त्यांनी राज्याच्या पाटबंधारे, वीजनिर्मिती, कृषीविकास या क्षेत्रांत भरीव व दीर्घकालीन लाभ देणारे काम केले. मुख्यमंत्री असताना लोकहिताचे अनेक निर्णय घेतले तर केंद्रात गृहमंत्री असताना अनेक जटील प्रश्न सोडविले. या प्रदीर्घ राजकीय कारगीर्दीतील त्यांच्या कार्यशैलीतील विविध पैलुंवर प्रकाश टाकणारे सत्तराहून अधिक लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत.

हे देखील वाचलेच पाहिजे - मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना सर्वाधीक फटका.....कसा तो वाचा
 

बालमित्रांच्या मैत्रीला उजाळा
मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत भगवंतराव देशमुख हे शंकररावांचे पैठण येथील बालमित्र होते. निशिकांत भालेराव यांनी त्यांच्या लेखात या दोन बालमित्रांच्या मैत्रीला उजाळा दिला आहे. लहानपणी शंकरराव देशपक्तीपर स्फुर्तिगीते खड्या आवाजात गात आणि वातावरण बदलून टाकीत. तसेच शंकरराव शाळेत खोड्या आणि दांडगाईसाठी प्रसिद्ध होते, असे भगवंतरावांचा हवाला देत भालेराव यांनी नमूद केले आहे. शंकरराव व अनंतराव भालेराव यांच्या भेटीदरम्यान अत्यंत अनौपचारिकपणा भालेराव यांनी त्यांच्या लेखात विस्ताराने सांगितला आहे. 

दिग्गज मंडळींच्या सहकार्यानेच गौरवग्रंथ पूर्ण
कोरोनाच्या टाळेबंदीमुळे जनजीवन ठप्प झालेले असताना दिग्गज मंडळींनी लेखन सहकार्य केल्याने ग्रंथाचे काम अतिविलंब न होता पूर्ण करता आले. 
- डॉ. सुरेश सावंत

loading image