Nanded News : नवी दिल्लीतील 'ESTIC 2026' राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. विजयकुमार जाधव यांची सलग दुसऱ्यांदा निवड!

नवी दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या 'ESTIC 2026' या राष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. विजयकुमार जाधव यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
Dr. Vijaykumar Jadhav

Dr. Vijaykumar Jadhav

sakal

Updated on: 

नवीन नांदेड - भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील 'भारत मंडपम' येथे ता. २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठित ‘इमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह’ (ESTIC 2026) या राष्ट्रीय परिषदेसाठी छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, उदगीर येथील भौतिकशास्त्र विभाग प्रमुख तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यपीठाचे माजी विद्यार्थी डॉ. विजयकुमार जाधव यांची 'युवा विज्ञान व तंत्रज्ञान लीडर' म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांची या उच्चस्तरीय परिषदेसाठी निवड झाली होती, त्यांनी आपले हे यश सलग दुसऱ्यांदा टिकवून ठेवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com