esakal | खासगी कोविड सेंटरचे रुग्णसेवेचे स्वप्न भंगले, सोमवारी फक्त २९ जण पॉझिटिव्ह, ५९ कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

सोमवारी (ता. दोन) अहवाल प्राप्त झाला असून, यामध्ये केवळ २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

खासगी कोविड सेंटरचे रुग्णसेवेचे स्वप्न भंगले, सोमवारी फक्त २९ जण पॉझिटिव्ह, ५९ कोरोनामुक्त 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली होती. अजून कोरोना रुग्णात वाढ झाल्यास त्यांना ठेवायचे कुठे? हा मोठ्या प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयाची बैठक बोलावून १५ ते १६ खासगी कोविड सेंटर सुरु करण्यास मान्यता दिली होती. परंतू, अचानक रुग्णसंख्या कमी झाल्याने खासगी रुग्णालयाते रुग्णसेवेचे स्वप्न भंगले असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. 

सोमवारी (ता. दोन) प्राप्त झालेल्या अहवालात ५९ रुग्ण कोरोनामुक्त, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू तर २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याभरात केवळ ४९४ कोरोना बाधितांवर उपचार सुरु असून, यापैकी खासगी रुग्णालयात मात्र ४६ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. 

हेही वाचा- विधायक : कुंभार समाजातील कारागिरांना ईलेक्ट्रिक चाके प्रदान ​

जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ५१५ वर 

रविवारी (ता. एक) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबचा सोमवारी (ता. दोन) अहवाल प्राप्त झाला असून, यामध्ये केवळ २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १९ हजार २०३ एवढी झाली आहे. सोमवारी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या गंभीर रुग्णापैकी रामनगर हदगाव येथील पुरुष (वय- ७५) या कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ५१५ वर पोहचला आहे. 

हेही वाचले पाहिजे- मुदखेड सराफावर हल्लाप्रकरणी दरोडेखोरांना अटक करा; तहसिलदारांना निवेदन ​

आतापर्यंत १८ हजार ३८ कोरोना बाधितांची आजारावर मात

सोमवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील- दहा, जिल्हा रुग्णालयातील - तीन, एनआरआय भवन, गृह विलगिकरण- दहा, कंधार- सहा, उमरी- एक, देगलूर- एक, मुखेड- एक, धर्माबाद- एक, माहूर- सात, बिलोली- एक, हिमायतनगर - एक, मुदखेड- पाच, किनवट- एक, औरंगाबाद- एक, हैदराबाद - दोन आणि खासगी कोविड सेंटर मधे उपाचार सुरु असलेल्यापैकी आठ असे ५९ कोरोना बाधितांनी आजारावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत १८ हजार ३८ कोरोना बाधितांनी आजारावर मात केली आहे. 

४१४ स्वॅबची तपासणी सुरु 

रविवारी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालात सोमवारी नांदेड महापालिका क्षेत्रात- २५, किनवट- एक, मुखेड- एक, हिंगोली- दोन व परभणी- एक असे २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ४९४ बाधितांवर उपचार सुरु असून, त्यापैकी ३१ जणांची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ४१४ स्वॅबची तपासणी सुरु होती. 

कोरोना मीटर 

आज पॉझिटिव्ह- २९ 
आज कोरोनामुक्त- ५९ 
आज मृत्यू- एक 
एकूण पॉझिटिव्ह- १९ हजार २०३ 
एकूण कोरोना मुक्त- १८ हजार ३८ 
एकूण मृत्यू- ५१५ 
गंभीर रुग्ण- ३१ 
स्वॅब अहवाल प्रतिक्षेत- ४१४ 
 

 
 

loading image