
२६ जानेवारीचा मुहूर्त साधत कार्यलयीन कर्मचारी व लोकसहभागातून आयुर्वेदिक औषधी वनस्पती या शिवाय विविध प्रकारचे गुलाब, मोगरा, अंबे हळद पासून ते केळीच्या झाडापर्यंत अशी साडेतीनशे पेक्षा अधिक गुणकारी झाडांची लागवड केली.
नांदेड - काही वर्षापूर्वी शहराबाहेर माळटेकडी परिसरात सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीमध्ये विविध विकास महामंडळासहित न्यायविभागाच्या नव्या इमारतीमध्ये शासकीय कामकाज सुरू झाले. मात्र परिसरात एकही झाड नसल्याने संपूर्ण परिसर भकास वाटत होता. सहायक समाज कल्याण आयुक्त तेजस माळवदकर यांनी (ता.२६) जानेवारी २०२० च्या मुहूर्त साधत लोकसहभागातुन संपूर्ण परिसरात अनेक झाडे लावली होती. त्यास मंगळवारी (ता.२६) एक वर्ष पूर्ण झाले. आज या परिसरातील गार्डनमुळेमुळे भवनाला नंदनवनाचे स्वरुप आले आहे.
अगदी एका वर्षापूर्वी गावाबाहेर असलेल्या या शासकीय कार्यालयात आल्यास परिसर भकास वाटत होता. त्यामुळे परिसरात कुणाचाही पाय थांबत नव्हता. दरम्यान बी.एन.वीर यांच्या बदलीनंतर श्री.माळवदकर नांदेडला रुजु झाले. त्यांनी २६ जानेवारीचा मुहूर्त साधत कार्यलयीन कर्मचारी व लोकसहभागातून आयुर्वेदिक औषधी वनस्पती या शिवाय विविध प्रकारचे गुलाब, मोगरा, अंबे हळद पासून ते केळीच्या झाडापर्यंत अशी साडेतीनशे पेक्षा अधिक गुणकारी झाडांची लागवड केली.
हेही वाचा- नांदेड - वार्धक्याकडे झुकलेल्या कलामंदीराला आजही कलावंताची प्रतिक्षा
नांदेड पॅटर्न रोल मॉडेल
केवळ झाडे लावून न थांबता त्या झाडांना जपले, वेळोवेळी त्यांची निगा राखली. आज ही झाडे पाच फुटापेक्षा अधिक उंच वाढली आहेत. शिवाय श्री माळवदकर यांनी सामाजिक न्यायभवन आणि जात पडताळणी जिल्हा कार्यालयाच्या मधोमध रिकाम्या जागेत दोन्ही बाजुस कार्यालयीन कर्मचारी व येणाऱ्या अभ्यांगतासाठी स्वतंत्र गाडी पार्किंग व उरलेल्या जागेत अतिशय देखणे गार्डन तयार करुन एक आदर्श सामाजिक न्यायभवन इमारतीचे नांदेड पॅटर्न रोल मॉडेल तयार केले आहे.
हेही वाचा- रमाई घरकुल योजनेची तिजोरी फुल; माहूर तालुक्यातील लाभार्थ्यांची दोन वर्षांची प्रतीक्षा संपली
अभ्यांगतांना बसण्यासाठी १८ ते २० सिमेंटची बाकडे भेट
या वेळी माळवदकर यांच्यासह १७ कर्मचाऱ्यांनी मिळून अभ्यांगतांना बसण्यासाठी १८ ते २० सिमेंटची बाकडे भेट म्हणून दिली आहेत. परिसरात प्रत्येक ठिकाणी स्वंतंत्र कचरा पेटी असल्याने परिसरात कुठेही कचरा दिसत नाही. अगदी निट-नेटका परिसर येणाऱ्या प्रत्येकास नंदनवनासारखा खुणावतो आहे.
झाडे लावणे आपल्या सर्वांचे कर्तव्य
कर्तव्य एका बाजुस आणि सामाजिक दायित्व एका बाजुस यातुनच झाडे लावण्याची आवड निर्माण झाली. जिथे जाईल तिथे झाडे लावण्यासाठी नेहमीच प्रयत्न असतो. नांदेडला सामाजिक न्याय विभागाचा सहायक आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर परिसरात झाडे लावण्याची संधी मिळाली. इथल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गेल्यावर्षी आनंदघनवन योजनेच्या माध्यमातुन झाडे लावली. ती आज मोठी झाल्याचे बघुन मनापासून आनंद वाटतो.
- तेजस माळवदकर, सामाजिक न्याय विभाग सहायक आयुक्त, नांदेड.