
कलामंदीर नाट्यगृहाची जागी एका ट्रस्ट कडे आहे. परंतु त्यांच्याकडे कलामंदीरला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी पुरेसा पैसा निधी उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या जागेवर व्यवसायीक शॉपिंग कॅम्पलेक्स सोबतच मंगलकार्यालय व नाट्यगृह उभारण्याचा ट्रस्टच्या काही सदस्यांचा माणस होता
नांदेड - शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले ‘कलामंदीर’ असा तोंडून शब्द निघाला, तरी अनेक नाट्यप्रेंमींच्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर तरळुन जातात. असे हे कलामंदीर मागील अनेक वर्षापासून मोडकळीस आले आहे. एकेकाळी नांदेडचे वैभव असलेल्या कलामंदीरची पडझड झाली आहे. दुरवस्था होऊन वार्धक्याकडे झुकलेल्या या कलामंदीराला आजही कलावंताची प्रतिक्षा कायम आहे.
सध्या कलामंदीर नाट्यगृहाची जागी एका ट्रस्ट कडे आहे. परंतु त्यांच्याकडे कलामंदीरला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी पुरेसा पैसा निधी उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या जागेवर व्यवसायीक शॉपिंग कॅम्पलेक्स सोबतच मंगलकार्यालय व नाट्यगृह उभारण्याचा ट्रस्टच्या काही सदस्यांचा माणस होता. त्यासाठी ट्रस्टच्या वतीने प्रस्ताव देखील तयार करण्यात आला होता. परंतु त्यास यश आले नाही. महापालिकेने देखील ही जागा सांस्कृतीक कलमंदीरासाठी दिली असल्याने त्यावर सांस्कृतीक कलामंदीरच व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केल्याने त्याजागेवर आजपर्यंत काहीच होऊ शकले नाही. असे अनेक रंगकर्मी कडून सांगण्यात येते.
ट्रस्टची जागा एका परिवाराच्या मालकीची
पुढे महापालिकेनी ट्रस्टकडून जागेचा काहीच उपयोग होत नसल्याने ही जागा महापालिकेकडे वर्ग करावा असा प्रस्ताव ट्रस्टकडे ठेवला मात्र पुढे काय झाले या बद्दल कुणीच काही बोलत नाही. असे असले तरी, महापालिका देखील कलामंदीर परिसरातील जागेवर व्यवसायीक गाळे काढून ते भाडेतत्वावर देण्याच्या प्रयत्नात होती. त्यामुळे ना ट्रस्टने जागा महापालिकेला परत केली ना महापालिकेने ट्रस्टवर दबाव टाकला. त्यामुळे सध्या ही ट्रस्टची जागा एका परिवाराच्या मालकीची झाल्याने अनेक रंगकर्मी, कलाप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा- आईनं जगाचा निरोप घेतला; धक्का सहन न झाल्यानं मुलाचाही मृत्यू
अशी आहे कलामंदीराची व्यथा ः
- १९६२ मध्ये जिल्हाधिकारी हे त्या ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष होते. पुढे १५ ते २० वर्षापर्यंत जिल्हाधिकारी हेच पदसिद्ध अध्यक्ष असायचा.
- पुढे या ट्रस्टींनी जिल्हाधिकारी यांना अध्यक्षपदावरुन बाहेर काढले.
- दरम्यान कलामंदीरच्या साईटने २०० ते ३०० गाळे काढून ते व्यवसायीकरण करण्याचा प्रयत्न झाला.
- राजकीय नेत्याने ट्रस्टच्या ताब्यातील जागा महापालिकेकडे परत करावे यासाठी दबाव टाकला होता.
- जिल्ह्यातील सांस्कृतीक क्षेत्रातील मंडळींना म्हणावे त्या प्रमामात कलामंदीर ट्रस्ट मध्ये स्थान दिले जात नाही.
- कलामंदीर खासगी ट्रस्टच्या मालकीची जागा.
- मोचक्याचा कार्यक्रमासाठी ट्रस्टीकडून परवानगी.
ट्रस्टकडून नेहमी सहकार्य लाभले
सांस्कृतीक कार्यक्रम करण्यासाठी ट्रस्ट कडून नेहमीच पाठिंबा मिळत आलेला आहे. सांस्कृतीक कार्यक्रमासाठी जागा देण्यासाठी तयार असतात. मी अनेक वेळा याच कलामंदीरात नाट्य स्पर्धा घेतल्या आहेत. त्यासाठी कुणी कधीच अडवणूक केली नाही.
- नाथा चितळे, ज्येष्ठ नाट्य कलावंत.