esakal | आठवडाभरात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी घेतली ऊसळी, सोमवारी ३६ पॉझिटिव्ह, ५३ रुग्ण कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

नांदेड - आठवड्याभरापूर्वी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या अडीचशेवर आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. सोमवारी (ता.२३) आलेल्या अहवालात ५३ रुग्ण कोरोनामुक्त, एकाचा मृत्यू आणि ३६ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली. कोरोनातुन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ९५ टक्यावरुन ९४ टक्यावर आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

आठवडाभरात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी घेतली ऊसळी, सोमवारी ३६ पॉझिटिव्ह, ५३ रुग्ण कोरोनामुक्त 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - आठवड्याभरापूर्वी जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या अडीचशेवर आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. सोमवारी (ता.२३) आलेल्या अहवालात ५३ रुग्ण कोरोनामुक्त, एकाचा मृत्यू आणि ३६ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली. कोरोनातुन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ९५ टक्यावरुन ९४ टक्यावर आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

रविवारी (ता. २२) घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणीतील अहवालात सोमवारी (ता.२३) एक हजार ८२० जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामधील एक हजार ७१४ निगेटिव्ह, ३६ अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० हजार ४२ इतकी झाली आहे. 

हेही वाचा - खाकीतील माणुसकी : आदिवासी पाड्यावरील आदीमाना मायेची ऊब ​

६२ वर्षीय पुरुषाचे उपचारादरम्यान मृत्यू 

सोमवारी दिवसभरात विष्णुपुरीच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील - पाच, श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - पाच, महापालिकेंतर्गत - २९, हदगाव- एक, मुखेड - एक, अर्धापूर - दोन आणि खासगी कोविड केअर सेंटरमधील - दहा असे ५३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १८ हजार ९४७ इतकी झाली आहे. तर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले शिवकल्याण नगरातील ६२ वर्षीय पुरुषाचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचारादरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ५४५ वर पोहचली आहे. 

हेही वाचले पाहिजे - नांदेड : एकाची आत्महत्या तर दुसऱ्याचा तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू. धर्माबाद तालुक्यातील घटना ​

१७ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर 

सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात नांदेड महापालिका क्षेत्रात - २७, नांदेड ग्रामीण - एक, किनवट - एक, भोकर - एक, कंधार - एक, देगलूर - दोन, नायगाव - दोन आणि परभणी एक असे ३६ कोरोना बाधित आढळुन आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या २० हजार ४२ इतकी झाली आहे. त्यापैकी १८ हजार ९४७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ५४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३५५ बाधित रुग्णावर उपचार सुरु आहेत. त्यामधील १७ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. सोमवारी संध्याकाळी उशिरापर्यंत ५२६ स्वॅबची चाचणी सुरु होती. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ९५ टक्यावरुन ९४ वर आली आहे. 

कोरोना मीटर - 

आज पॉझिटिव्ह रुग्ण - ३६ 
आज कोरोनामुक्त - ५३ 
आज मृत्यू - एक 
एकुण पॉझिटिव्ह - २० हजार ४२ 
एकुण कोरोनामुक्त - १८ हजार ९४७ 
एकुण मृत्यू - ५४५ 
उपचार सुरु - ३५५ 
गंभीर रुग्ण - १७ 
स्वॅब अहवाल प्रलंबित - ५२६ 

loading image