esakal | अंडे महागले! किरकोळ विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट
sakal

बोलून बातमी शोधा

'संडे हो या मंडे' रोज खा अंडे; ...कारण झालंय 'हे'

अंडे महागले! किरकोळ विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोना (Corona) काळात दररोज अंडी खा, प्रोटिन्स खा! असे आवर्जून सांगितले जात होते. त्यामुळे मागणी वाढली. सद्य:स्थितीत आवकही सुरळीत झाल्याने ठोक बाजारात अंड्याचे दर एक रुपयाने घसरले आहे. मात्र, किरकोळ बाजारात सात रुपये प्रति अंड्याची विक्री करत व्यापारी ग्राहकांची लूट करित आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडी (Egg) खाण्याचा सल्ला दिला जात होता. त्यामुळेच भाव वाढलेले होते. आता कोरोनाची लाट ओसरली असली तरी अंड्याची मागणी कायम आहे.अंड्यांचे उत्पादन नियमित सुरु झालेले आहे. अंड्याची वाहतूक सुरळीत होत असल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे ठोक बाजारात एका अंड्यासाठी चार रुपये ८५ पैसे दर आकारले जात आहे. किरकोळ बाजारात मात्र अद्यापही एका अंड्यासाठी सात रुपयेच ग्राहकांना मोजावे लागत आहेत.(eggs price hike, sellers take extra rupees in nanded glp88)

हेही वाचा: मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

किरकोळ व्यापारीच आता सर्वसामान्य ग्राहकांची लूट करीत असल्याचे चित्र आहे. जाणकराच्या मते अंड्याचे दरात घसरण झालेली असल्याने किरकोळ बाजारात एका अंड्यांसाठी सहा रुपये आकारायला हवे, किरकोळ व्यापारी अधिकचा नफा कमविण्यासाठी ग्राहकांची लुट करीत आहेत. डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीने अधिक मेटाकुटीला आलेला आहे.

loading image
go to top