Nanded News | इलेक्ट्रिक वाहनांना ‘अच्छे दिन’; वाढत्या इंधन दरामुळे मिळतेय पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

electric vehicles

इलेक्ट्रिक वाहनांना ‘अच्छे दिन’; वाढत्या इंधन दरामुळे मिळतेय पसंती

नांदेड : वाढत्या इंधन दरवाढीमुळे आता नागरिक विद्युत वाहनांच्या खरेदीला पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे विद्यूत वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नांदेड शहरात सुमारे ६०० च्यावर नवीन विद्युत वाहने दाखल झाली आहेत. मागील वर्षीच्या तुलनेतल या वाहनांच्या संख्येत तिप्पटीने वाढ झालेली आहे.

आगामी काळात यात वाढ होईल, असे वाहन विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पारंपरिक इंधनाचा तुटवडा व प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने विद्युत वाहनांबाबत धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे त्याला गती देण्याचा प्रयत्न नांदेड शहरात बघायला मिळत आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीने शंभरी पार केलेली आहे. सातत्याने होणारी दरवाढ यामुळे अनेक वाहनचालक आता विद्युत वाहन खरेदीकडे वळू लागल्याचे चित्र नांदेड शहरामध्ये दिसून येत आहे. पेट्रोल, डिझेल वाहनांच्या तुलनेत हे बचतकारक आहे. त्यामुळे पेट्रोलपंपावर रांग लावणेही यामुळे टाळता येते असे विद्युत वाहनधारक सांगत आहेत.

गेल्या वर्षापासून नांदेड शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विद्युत वाहन नोंदणीची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. २०२०-२१ मध्ये सुमारे १०० विद्युत वाहनांची नोंद करण्यात आली होती. २०२१-२२ मध्ये आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक वाहनांची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तीन पटीहून अधिक वाहने नोंदणी झालेली आहे. या वाहनांमध्ये ३२५ दुचाकी, ५० चारचाकी, सहा ई-रिक्षा प्रवासी असे एकूण ३८१ वाहनांची नोंद झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून मिळाली. दैनंदिन व जवळपासच्या प्रवासासाठीही विद्युत वाहने उपयुक्त ठरत आहेत.

इंधनापेक्षा चार्जिंगचा खर्च कमी

इंधनाच्या खर्चापेक्षा चार्जिंग करण्यास लागणाऱ्या विजेचा खर्च कमी आहे. एकदा तीन ते चार तास वाहन चार्जिंग केले की ते वाहन साधारणपणे ९० ते १०० किलोमीटरपर्यंत चालते. त्यामुळे पैशाची चांगली बचत होऊ लागली आहे. असे विद्युत दुचाकी चालक अविनाश गाजरे यांनी सकाळशी बोलतांना सांगितले.

''पारंपरिक इंधनात झालेली दरवाढ व महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले धोरण पाहता आता विद्युत वाहनांकडे खरेदीदारांचा कल वाढत आहे. आगामी काळात यात वाढ होणार असून पुढील युग हे विद्युत वाहनाचे असेल.''

- विद्युत वाहन विक्रेते, नांदेड

Web Title: Electric Vehicles Rising Fuel Prices City Of Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..