Nanded politics : काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश ; अशोक चव्हाण, चिखलीकरांच्या उपस्थितीत बैठक

माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात बुधवारी (ता. २०) प्रवेश केला आहे.
Nanded politics
Nanded politics sakal

नांदेड : माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात बुधवारी (ता. २०) प्रवेश केला आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मगनपुरा येथील प्रगती महिला मंडळ येथे दुपारी एक वाजता बैठक झाली. यावेळी अध्यक्षस्थानी भाजप ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव गाते होते.

प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजपचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, लक्ष्मणराव जाधव, विजयराव देवडे, नामदेव आयलवाड, सुशिलकुमार जाधव, अशोकराव मुगावकर, दीपकसिंह रावत, विनायक सगर, व्यंकटेश जिंदम, भुमन्ना आक्कमवाड, मनोहर पवार, महादेवी मठपती, जयश्री जयस्वाल आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

Nanded politics
Nanded Lok Sabha Election 2024 : नांदेडला २६ एप्रिलला मतदान होणार : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

या प्रसंगी विजयराव देवडे लहानकर, नामदेव आयलवाड, व्यंकटराव पार्डीकर, नंदकुमार कोसबतवार, अमित काबरा, कृष्णराव चिंतलवार, लक्ष्मणराव जाधव, शिवाजीराव पांगरेकर, विठ्ठलराव आचार्य, रमेश गिरी, नेहा शर्मा, भुमन्ना आकेमवाड, जयश्री जयस्वाल, सीमा राठोड,  कोशल्याबाई तेलंग आदींनी प्रवेश केला आहे. दरम्यान, यावेळी खासदार चव्हाण, खासदार चिखलीकर, श्री. गाते आणि श्री. आयलवाड यांची भाषणे झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com