गोजेगाव येथील पाझर तलाव फूटून शेतीचे झाले मोठे नुकसान

file photo
file photo

मुक्रमाबाद (जिल्हा नांदेड) : तब्बल पंधरा दिवसापासून परिसरात  मुसळधार पावसाने मोठा कहर माजविला असून सोमवार व मंगळवार या दिवशी परिसरात  झालेल्या मुसळधार पाऊस झाल्यामुळे मुखेड तालुक्यातील गोजेगाव येथील पाझर तलाव हा मंगळवार दि २२ रोजीच्या राञी फुटल्याने तलावा खालची शेकडो हेक्टर शेती खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले सोयाबीन, तूर, उडीद,ज्वारी यापिकांसहा इतर पिके  वाहून गेल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.  

यावर्षीचा पावसाळा सुरू झाल्या पासून मुक्रमाबाद मंडळात पावसाने अक्षरशः हा..हा..कार माजविला असून आतापर्यत  तब्बल चार वेळा अतिवृष्टी झाली असून लेंडी नदीसह नाले,ओढे हे,भरभरून वाहत आहेत. तर  सर्वच पाझर तलाव हे, तुडुंब भरले असून या तलावाच्या मुख्य तटभिंती वरून व सांडव्यावरून पाणी हे.भरभरून वाहत असल्यामुळे तलावाच्या तटभिंतीला मोठे भगदाड पडले आहेत. तर गावक-यांनी  प्रशासनाला याची माहिती देऊनही प्रशासन हे, अशा धोकादायक तलावाची डागडूजी करण्यासाठी काहीच उपाय योजना करत नसल्यामुळे हे, पाझर तलाव फुटून शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान होत आहे.

 पिके ही या तलाव फुटीमुळे पुर्णपणे वाहून जाऊन शेतात मोठे दगड येऊन साठली

परीसरात सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जवळपास सर्वच पाझर तलाव हे, धोक्याची पातळी ओलांडली असून तटभिंतीवरून पाणी वाहत असून हे, तलाव कोणत्याही क्षणी फूटून शेतीचे तर मोठे नुकसान होईलच पण जिंवित हाणीही मोठी होण्याची दाट शक्यता असतानाही संबंधित प्रशासन माञ काहीच उपाय योजना करताना दिसत नाही . हे, विशेष तर गोजेगाव येथील तलाव हा रात्रीच्या वेळी  अचानक  फुटल्यानंतर गावात पाणी शिरल्यामुळे गावातील अनेक लोकांनी एकमेकांना साह्य करत घराच्या छतावर तर काही जण उंच ठिकाणी सुरक्षित स्थानी गेल्यामुळे मोठी हानी टळली. पण शेतात आलेली लसलशीत पिके ही या तलाव फुटीमुळे पुर्णपणे वाहून जाऊन शेतात मोठे दगड येऊन साठली असून शेतीला सर्व वाळवंटाचे स्वरूप आले आहे.शेतातील उभे पीक वाहून गेले असल्यामुळे शेतकऱ्यांचे  आर्थिक गणित विस्कटले असून हे.वर्षे कसे काढावे या विवंचनेत येथील शेतकरी आडकला  असून शासनाने आर्थिक मदत करावी ही.आस उराशी  धरून आहे. 

कोट्ग्याळ व गोजेगाव येथील शेतीचे व नागरिकांचे मोठे नुकसान

कोट्ग्याळ येथील पाझर तलावाच्या तटभिंतीवरून पाणी वाहत असल्यामुळे हा तलाव कोणत्याही क्षणी फूटून कोट्ग्याळ व गोजेगाव येथील शेतीचे व  नागरिकांचे मोठे नुकसान होणार हे, माञ निश्चित असतानाही प्रशासन माञ यावर काहीच उपाययोजना करत नसल्यामुळे नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झालेला असल्यामुळे या तलावात अतिरिक्त जमा झालेले पाणी काढून हा तलाव सुरक्षित करावा अशी नागरिकांकातून मागणी पुढे येत असतानाही प्रशासन हे. झोपेचे सोंग घेऊन मोठी दुर्घटना होण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येते.

परीसरातील पाझर तलाव फुटण्याच्या घटनेत वाढ

सततच्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना मोड फुटली असल्यामुळे शेतकरी हा शेतातील पिकांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना माञ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे परीसरातील पाझर तलाव फुटण्याच्या घटनेत वाढ झाली असून यामुळे शेती खरडून जाऊन शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक भरपाई देऊन त्यांना दिलासा द्यावा .

- शिवशंकर पाटील कलंबरकर. रयत क्रां युवा जिल्हा अध्यक्ष.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com