esakal | आठवड्याभरानंतरही नांदेडला दिलासा नाहीच, रविवारी ३२८ जण पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

रविवारी (ता. सहा) प्राप्त झालेल्या एक हजार २४३ अहवालापैकी ८४२ जण निगेटिव्ह तर ३२८ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर २०८ रुग्ण कोरोना मुक्त झाले. दिवसभरात सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

आठवड्याभरानंतरही नांदेडला दिलासा नाहीच, रविवारी ३२८ जण पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड -  बाधित रुग्ण आणि मृत्यूची संख्या कमी होत नसून रविवारी (ता. सहा) प्राप्त झालेल्या एक हजार २४३ अहवालापैकी ८४२ जण निगेटिव्ह तर ३२८ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर २०८ रुग्ण कोरोना मुक्त झाले. दिवसभरात सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. त्यामुळे आठवड्याभरानंतरही नांदेडकरांना दिलासा मिळाला नाही. 

रविवारी (ता. सहा) शासकीय रुग्णालयातील -पाच, जिल्हा रुग्णालयातील -चार, पंजाब भवन कोविड सेंटरमधील - २३, मुखेड- ८०, लोहा- चार, नायगाव-सात, देगलूर-आठ, बिलोली- १६, माहूर- दोन, उमरी-११, कंधार-तीन, धर्माबाद-१३, हदगाव-नऊ, बारड- एक, किनवट- १८, भोकर- चार, असे २०८ कोरोनाबाधित रुग्णांनी दहा दिवसानंतर कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत पाच हजार ६५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचा- नांदेड- राज्यातील एसटी चालक-वाहक महिला न्यायाच्या प्रतिक्षेत ​

सात बाधितांचा मृत्यू

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या सात बाधितांचा रविवारी मृत्यू झाला. यात दत्तनगर किनवट पुरुष (वय ६०), तळेगाव तालुका हदगाव महिला (वय ५०), व्यंकटेशनगर कंधार पुरुष (वय ८५), निपानी सावरगाव ता. कंधार महिला (वय ७०), तथागतनगर नांदेड पुरुष (वय ५७), वजिराबाद नांदेड पुरुष (वय ४९), शिकारा मुखेड पुरुष (वय ७०) या सात बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारपर्यंत २६५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- नांदेड : दयानंद वनंजे यांच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाने खळबळ

दोन हजार ९३७ रुग्णावर उपचार सुरू 

शनिवारी (ता. पाच) आरटीपीसीआर व ॲन्टीजेन किटद्वारे जिल्ह्यातील शेकडो संशयितांचे स्वॅब तपासणीकरिता घेण्यात आले होते. रविवारी (ता. सहा) यातीलएक हजार २४३ जणांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये ३२८ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आठ हजार ९९० वर इतकी झाली आहे. सध्या जिल्हाभरात दोन हजार ९३७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २५६ बाधितांची प्रकृती नाजुक असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी बाधितांमध्ये नांदेड मनपा क्षेत्र -१४६ , नांदेड ग्रामीण -१३, उमरी-सात, किनवट - १४, मुखेड -६८, नायगाव -१८, अर्धापूर- पाच, लोहा- आठ, कंधार-१३, बिलोली-१०, हदगाव- सात, धर्माबाद- सात, माहूर- तीन, मुदखेड- सात, हिंलोली - दोन, निजमाबाद -एक असे एकूण ३२८ जणांचा अहवाल बाधित आला आहे. 

कोरोना मीटर

रविवारी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ३२८ 
एकूण पॉझिटिव्ह - आठ हजार ९९० 
रविवारी मृत्यू- सात 
एकूण मृत्यू संख्या-२६५ 
एकूण रुग्णालयातून सुट्टी -पाच हजार ६५३ 
रुग्णालयात उपचार सुरु- दोन हजार ९३७ 
रविवारी रोजी गंभीर प्रकृती रुग्णसंख्या- २५६