
दहा नवजात बाळांच्या मृत्यूमुळे संबंध राज्यभर समाजमन हेलावून गेले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ह्या तर शहरातील आरोग्य सेवेपेक्षा कितीतरी दुर आहेत
अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : भंडारा जिल्हा सामन्य रुणालयात शनिवार (ता. नऊ) मध्यरात्री झालेल्या दर्घटनेत दहा नवजात बाळांच्या मृत्यूमुळे संबंध राज्यभर समाजमन हेलावून गेले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ह्या तर शहरातील आरोग्य सेवेपेक्षा कितीतरी दुर आहेत. या घटनेने प्रत्येक नागरिकात तीव्र भावना दिसून येत आहेत.
मुलं म्हणजे देवाघरची फुलं. जो रंजन करिल मुलांचे, त्याचे नाते जडेल प्रभुशी असे म्हटले जाते. हस-या खेळत्या बाळाकडे पाहिले की माता- पित्यांचे सारे दुख दुर होते. पण जेंव्हा नवजात बालकांचे फुल पुर्णपणे उगवण्याआधीच निर्माल्य होते तेव्हा त्यांच्या आई- वडिलांना किती वेदना झाल्या असतील या बाबत आपण कल्पनाही करु शकत नाही. ज्या बाळांनी ज्या रुग्णालयात पहिला श्वास घेतला त्याच रुग्णालयात जन्माला आल्यानंतर काही तासाच अखेरचा श्वास घेतला. जिथे काही दिवासापूर्वी आनंदाचे वातावरण होते. आपल्या परिवारात आलेल्या चिमुकल्याच्या आनंदात मिठाई वाटप झाली असेल त्या परिवारात आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा - हिंगोली : जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसानीचे ११५ कोटी ९८ लक्ष रुपये मंजूर
आरोग्य यंत्रणा किती बधीर झाली आहे
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नुकत्याच उमलेल्या फुलांचे निर्माल्य झाले आहे. आपली आरोग्य यंत्रणा किती बधीर झाली आहे हे या घटनेने समोर आली आहे. चौकशी होईल, दोषींवर कारवाई होईल, काही सुधारणा होतील, काही निलंबित होतील, शासना मदत ही देईन. पण ज्या मातेने नऊ महिने बाळाला आपल्या उदरात वाढविले, त्याला सुरक्षित ठेवले, त्याच्या जन्मासाठी प्रसव वेदना सहन केल्या, त्या मायेच्या अपार दुःखाची भरपाई कशी होणार याचे उत्तर कोणाकडे आहे काय.
भंडा-याच्या घटनेने आम्हाला जागे केले
आमचे समाजमन बधीर झाले आहे. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारजी भुल देण्यात आल्यामुळे आमचे समाजमन बेशुद्ध झाले आहे. या सामान्य रुग्णालयात प्रसूतिला आलेल्या माता हा सामान्य कुटुंबातील, मजुरी करणा-या ज्या कुटूंबाला खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नाही अशाच कुटुंबातील असतील.त्यांच्यासाठी मापबाप सरकार चांगल्या सुविधा देणार आहे काय? भंडा-याच्या घटनेने आम्हाला जागे केले आहे. आपण अजून आरोग्य सुविधेबाबत किती गाफील आहोत याची प्रचती कधी न भरुन येणाऱ्या घटनेने आली आहे.
येथे क्लिक करा - नांदेड : बदलती आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांनी सज्ज व्हावे : खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे
शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील रुग्ण
राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा ही सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच मोठ्या शहरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील रुग्ण उपचारासाठी जातात. या सर्व रुग्णालयाची काय अवस्था आहे हे इथे गेल्याशिवाय कळत नाही. अद्यावत उपकरणे नसतत, असलीच तर ते चालवणारे तज्ज्ञ नसतात. तसेच औषधी पुरवठा, मुलभुत सुविधा, स्वच्छता या बाबतीत रुग्णाचे अनुभव काही चांगले नाहीत.
या घटनेने सारा महाराष्ट्र हादरुन गेला
आता आपण जर भंडारा येथील जिल्हा सामान्य रुणालयात शनिवार मध्यरात्रीनंतर घडलेला अत्यंत दु:खदायक घटनेचा विचार केला तर ह्रदय पिळून टाकनारा आहे. या घटनेने सारा महाराष्ट्र हादरुन गेला आहे. येथील जिल्हा सामान्य रुणालयातील नवजात बालकांसाठी असलेल्या अतिदक्षता विभागात आग लागून जो धूर झाला यात दहा चिमुकल्यांचा गुदमरुन मृत्यू झाला तर सात चिमुकल्यांचा प्राण वाचविण्यात यश आले आहे. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेची चौकशी होईल, कूठे कमतरता होती, कोण दोषी आहे, काय करायला पाहिजे, आग सुरक्षा यंत्रणा, त्याचे परिक्षण आदींचा पाहणी होईल, दोषीवर कार्यवाही होईल ही पण यातून आम्ही काही शिकणार आहोत का नाही? सरकारी काम आणि सहा महिने थांब असे होणार नाही याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी,सामाजिक संघटना यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
नांदेडच्या ताज्या घटना घडामोडीसाठी येथे या
निरोगी समाज घडविण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज
ज्या डाॅक्टरांना करदात्याच्या करामधून वैद्यकीय शिक्षण मिळते, वेतन, सुविधा मिळतात त्याची आपण दिवसभराच्या कामातून किती केली याचे संध्याकाळी झोपतेवेळस थोडेसे आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयात विशेष तज्ज्ञ डाॅक्टरांची पदे तसेच इतर तज्ज्ञ व्यक्तींची पदे रित्त असतात. जी भरलेली आहेत ते वैद्यकिय अधिकारी, प्रशासकी अधिकारी यांनी आपल्याकडे मानवतेचा व नितिमुल्यांचा सिसिटीव्ही कॅमेरा पाहत आहे. याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. कारण आपल्या रुणालयात येणारा रुग्ण हा मजुर, कामगार, कष्टकरी, भटके जीवन जगणारा उपेक्षित, गोर- गरीब कुटुंबातील आहे. त्यांना कोणी वाली नसतो. देवानंतर आपल्यावर श्रध्दा ठेवतो. काही चांगले डाॅक्टर आहेत, तसेच अधिकारी आहे अशा संवेदनशील नागरिक, लोकप्रतिनिधी यांची संख्या वाढुन निरोगी समाज घडविण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. पुन्हा चिमुकल्या फुलांना पुर्णपणे उगवण्याच्या आधी निर्माल्या होण्याची वेळ येणार नाही.
संपादन - प्रल्हाद कांबळे