नियोजित नांदेड- तांडूर- परभणी रेल्वेला रायचूरपर्यंत वाढवा- प्रवाशी महासंघ

राजन मंगरुळकर 
Friday, 25 December 2020

रायचूर हे जिल्हा केंद्र असून मुंबई ते बेंगलूरू दुपदरी मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. रायचूर येथून केवळ अर्धा तासाच्या अंतरावर श्री राघवेंद्र स्वामींचे प्रसिद्ध मठ असलेले ठिकाण आहे.

नांदेड : येत्या नविन वर्षातील ता.10 जानेवारीपासून नियोजित करण्यात येत असलेल्या नांदेड- तांडूर (07681) - परभणी (07682) एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना रायचूर (कर्नाटक) पर्यंत विस्तार करून जाताना  नांदेड- रायचूर तर येताना रायचूर- परभणी दरम्यान चालविण्यात यावेत. तांडूर हे नांदेडपासून जवळच असलेल्या लिंबगांवसारखे 10 ते 12 हजार लोक वस्तीचे एक छोटेसे खेडे आहे. खरे म्हणजे तांडूर एक प्रकारे जंगली भाग आहे. अशा जंगली भागात जलद रेल्वेला अखेरचा स्टॉप देऊन सकाळी 8 ते सायंकाळी 8 म्हणजे तब्बल 12 तास उभी करण्याऐवजी सदर रेल्वेला तांडूरच्या पुढे चार तासांच्या अंतरावरील रायचूर पर्यंत वाढविण्यात यावे.

रायचूर हे जिल्हा केंद्र असून मुंबई ते बेंगलूरू दुपदरी मार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. रायचूर येथून केवळ अर्धा तासाच्या अंतरावर श्री राघवेंद्र स्वामींचे प्रसिद्ध मठ असलेले ठिकाण आहे. तरी राघवेंद्र स्वामींच्या दर्शनाला जाणार्या सर्व भाविकांची सोय होणार आहे. रायचूर स्थानकावरुन दररोज शंभरावर रेल्वे गाड्या दक्षिण भारताकडे धावतात. त्यात प्रामुख्याने तिरूपती, हंपी (हॉसपेट), हुबळी, धारवाड, गोवा, बेंगलूरू, म्हैसूर, मदुरै, सेलम्, तिपटूर, कोयम्बत्तूर, कन्याकुमारी, चेन्नईसहीत दक्षिण भारतातील सर्व ऐतिहासिक स्थळ पाहणाऱ्या पर्यटकांची सोय होणार आहे. हे सर्व कारणं लक्षात घेता नांदेड- तांडूर- परभणी एक्सप्रेसला रायचूरपर्यंत वाढविण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, प्रा सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, हर्षद शहा, शंतनु डोईफोडे, रितेश जैन, डाॅ राजगोपाल कालानी, ओंकार सिंग ठाकुर, किरण चिद्रवार, उमाकांत जोशी, कदरी लाला हाशमी, प्रवीण थानवी, सतीश टाकळकर, राजू माने, श्रीकांत गडप्पा, अमित कासलीवाल, दयानंद दिक्षीत इत्यादीने केली आहे.

हेही वाचा - हिंगोली : निवडणुकीसाठी कागदपत्रे जमा करण्यासाठी पुढाऱ्यांची धावपळ

नांदेड- तांडूर- परभणी रेल्वे तांडूरसारख्या खेड्यात सकाळी 8 ते रात्री 7. 45 पर्यंत थांबविण्यापेक्षा तीन तासांचा अंतरावरील मुंबई- बेंगलूरू मुख्य मार्गावरील जिल्हा केंद्र रायचूरपर्यंत वाढविणे आवश्यक आहे. सदर रेल्वे रायचूरपर्यंत वाढविल्यास संपूर्ण दक्षिण भारतातील मंत्रालयम, तिरूपती, हंपी (होसपेट), हुबळी, धारवाड, गोवा, बेंगलूरू, म्हैसूर, मधुरै, सेलम्, तिपटूर, कोयम्बत्तूर, कन्या कुमारी, चेन्नई सहीत दक्षिण भारतातील सर्व  शहरांना जाणार्या प्रवाश्यांची सोय होणार आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extend the planned Nanded-Tandur-Parbhani railway to Raichur- Passenger Federation nanded news