जड अंतःकरणाने ज्येष्ठा गौरीला निरोप

तीन दिवसांनंतर समारोप; महागाईतही महिलांमध्ये उत्साह कायम
Gauri Puja 2022
Gauri Puja 2022Esakal

नांदेड : यंदा शनिवारी (ता.3) ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले होते. रविवारी (ता.4) गौरींना नैवैद्य दाखविण्यात आला आणि सोमवारी (ता.5) आरती आणि हळदी कुंकु झाल्यानंतर ज्येष्ठा गौरींना जड अंतःकारणाने निरोप देण्यात आला. गणरायापाठोपाठ तीन दिवस चालणाऱ्या ज्येष्ठा गौरी उत्सवात सोमवारी सायंकाळी गौरींना निरोप देण्यात आला. राज्यभरात यंदा मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरींचा सण पार पडला. शनिवारी पहिल्या दिवशी राज्यभरात मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात आली. यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी गौरी पूजनानिमित्त सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. पुजेत ज्येष्ठा गौरींना विविध प्रकारच्या पदार्थांचा नैव्यद्य दाखवण्यात आला. त्यानंतर आज गौरींना महिलांनी जड अंतःकरणाने निरोप दिला.

ज्येष्ठा गौरींना निरोप भाद्रपद शुक्ल नवमी तिथीला केला जाते. यावर्षी ही तिथी ता. पाच सप्टेंबर रोजी होती. या दिवशी शुभ मुहूर्तावर गौरींची विधीवत पूजा, आरती करून मुर्तीचे मुकूट हलवून गौरींना निरोप दिला. दरम्यान, महिलांनी घरासमोर रांगोळी काढून हळदी - कुंकवाने गौरींची मार्गस्त पावले काढली होती. हातांच्या छापे काढले होते. काही ठिकाणी गौरींच्या मुर्ती विसर्जित केल्या जातात तर काही ठिकाणी त्याच मूर्ती परंपरागत वापरण्याची प्रथा आहे. राज्यातील विविध भागात हा उत्सव वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि मान्यतांनुसार साजरा केला जातो. यावर्षी कोरोना निर्बंध हटवण्यात आल्यामुळे राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत असून, रविवारी पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप दिल्यानंतर सोमवारी सायंकाळी गौरी-गणपतीला निरोप देण्यात आला.

आता नवरात्रोत्सवाची प्रतिक्षा

प्रत्येक सण आनंद घेऊन येत असतो. त्याचाच प्रत्यय यंदा येत आहे. दोन वर्षे कोरोनामुळे सर्वच सण - उत्सवांवर निर्बंध होते. यंदा गणराया पाठोपाठ गौरीच्या आगमनाची तयारी जोरात दिसून आली. आता नवरात्रोत्सवासाठी नागरिक आतुर आहेत. यंदा बाजारपेठाही विविध वस्तूंनी फुलली होती. सजावट व इतर साहित्यांच्या किमती गगनाला भिडल्या असल्यातरी नागरिकांचा विशेषतः महिलांचा उत्साह कमी झालेला दिसला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com