esakal | लाडक्या कोंबड्याची शेतकऱ्याने काढली वाजत-गाजत अंत्ययात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

nanded

लाडक्या कोंबड्याची शेतकऱ्याने काढली वाजत-गाजत अंत्ययात्रा

sakal_logo
By
विनोद आपटे

मुक्रमाबाद (नांदेड): गावरान कोंबडा म्हटले की, जिभेचे चोचले पुरविणारे स्वादिष्ट व चवदार जेवणाची मेजवानी असते. महाराष्ट्रातील प्रत्येकजण हा गावरान कोंबडा शोधत असतो व आपल्या जिभेचे चोचले पुरवित असतो. पण याला शंकर पोकले हे शेतकरी अपवाद ठरले असून आपल्या कोंबड्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची वाजत-गाजत अंत्ययात्रा काढून त्याचा अंत्यसंस्कार केला. पोकले यांचे हे पशूप्रेम पाहून सारे गावच गहिवरले.

मुखेड तालुक्यातील सावरमाळ येथील शंकर विठ्ठल पोकले. या शेतकऱ्याने गेल्या अनेक वर्षापासून एक राजा नावाचा कोंबडा पाळला होता. त्या कोंबड्यावर त्यांनी एखाद्या घरातील व्यक्तीप्रमाणे प्रेम करून सांभाळ करत त्याला वेळेवर जेवण, पाणी व आरोग्याची तपासणी करत होते. तर हा कोंबडा शंकर पोकले यांच्याच हाताने अन्न व पाणी घेत असे. एखाद्या वेळेस जर पोकले घरी नसले तरी हा कोंबडा तसाच उपाशी पोटी राहत असे. शेतकऱ्यांचे व या कोंबड्याचा एकमेकांशी असलेला जिव्हाळा पाहून परीसरातील मोठ्या चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरलेला होता.

हेही वाचा: PHOTOS: मुंबई-विजयवाडा महामार्गाच्या दर्जाहीन कामाचा सामान्यांना फटका

कोंबडा खाण्यासाठी पोकले यांच्याकडे तुम्ही मागेल तेवढे पैसे घ्या पण आम्हांला हा कोंबडा विकत द्या अशी मागणी केली. पण शंकर पोकले या शेतकऱ्याने या मागणीला साफ धुडकावून लावले व घरातील व्यक्तीला विकून त्या पैशावर मौजमजा करावी असे माझे संस्कार नाहीत. हा कोंबडा म्हणजे माझ्या कुटुंबातील सदस्य आहे, असे विकत मागणाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. पण काही दिवसापुर्वी मांजराने या कोंबड्यावर हल्ला करून त्याच्या मानेचे व इतर शरीराचे लचके तोडले होते.

हेही वाचा: 'मुख्यमंत्र्यांनीच भास्कर जाधवांच्या वागण्याचे समर्थन केले'

या राजा कोंबड्याच्या मृत्यूमुळे शेतकऱ्याचे कुटुंब शोकसागरात बुडाले. यातून सावरत या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जसा अंत्यविधी करतो. अगदी त्याचप्रमाणे माझ्या या राजाचाही अंत्यविधी करायचा असा निर्णय घेतला. या कोंबड्याला साबणाने अंघोळ घालून गुलाल टाकून विधीवत पुजा, अर्चा करून वाजत-गाजत त्याची गावातून अंत्ययात्रा काढून साश्रूनयनांनी त्याच्यावर आपल्या शेतात अंत्यसंस्कार केले.

loading image
go to top