विजेचा शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 23 July 2020

शेतकऱ्याच्या अंगावर विद्युत पुरवठा करणारी तार तुटून पडल्याने यात शेतकऱ्यास जबर शाॅक लागला. यातच त्याचा मृत्यू झाला.

नांदेड : आपल्या शेतात काम करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याच्या अंगावर विद्युत पुरवठा करणारी तार तुटून पडल्याने यात शेतकऱ्यास जबर शाॅक लागला. यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास निमटेच (ता. उमरी) येथे घडली. महावितरणच्या गलथान कराभाराचा बळी असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला.  

निमटेक येथील शेतकरी आपल्या शेतात बांधावर काम करत होता. यावेळी विद्युत प्रवाह असलेली विजेची तार अंगावर पडल्याने त्याच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.  महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकऱ्याचा नाहक जीव गेल्याने संताप व्यक्त     होत होता. महावितरणचे अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मयताचे नातेवाईक व गावकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण पसरले होते. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण निवळले. 

उमरी पोलिस ठाण्यात नोंद

निमटेक येथील शेतकरी आपल्या शेतात महिला मजूर लावून सोयाबीन निंदनीचे काम करीत होते. तेव्हा शेतात असलेल्या विद्युत खांबावरील विजेचा   प्रवाह असलेली तार तुटून खाली पडली आणि त्या तारेखाली शेख जमालमिया फरीदसाब (वय ६०) यांच्या दोन्ही पायांवर स्पर्श झाल्याने ते जागीच मरण पावले. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा -  कोरोना : बेवारस, वेडे, भिकारी यांच्यामुळे समुह संसर्गाची भिती, महापालिका बिनधास्त- अजयसिंह बिसेन

विनयभंग करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी 

हिमायतनगर तालुक्यातील खडकी येथील आरोग्य सेवेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी मोकाट फिरत असल्याने त्याला आता करावी अशी मागणी भारतीय प्रजासत्ताक पार्टीने केली आहे. ता. जुलै मंगळवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान माजी सरपंच व अनेक जण आरोग्य केंद्रात पोहोचले तेथे कार्यरत आरोग्य सेविकेला जातिवचक शिवीगाळ करून अपमानित केले आरोग्य सेविकेचे पती वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. आरोग्य केंद्रात सदर महिलेस मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये      गुन्हा दाखल झाला. परंतु यातील आरोपींना अटक करण्यात आली नाही. या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी भारतीय प्रजासत्ताक पार्टीच्या वतीने रवि भालेराव, राजू राऊत आणि सुभाष दारकुंडे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer dies of electric shock nanded news