शेतकरी गटाने केली अडचणीवर मात

कृष्णा जोमेगावकर
गुरुवार, 30 एप्रिल 2020

लोणाळ (ता. मुखेड) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येवून ‘आत्मा’तंर्गत महात्मा फुले शेतकरी गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातुन निविष्ठा खरेदीसह शेतीमाल एकत्र विक्री करत शेतीमालाचे मुल्यवर्धन करण्याचा प्रयत्न कामील काही वर्षापासून केला जात आहे.

नांदेड : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे सध्या शेतीमाल, भाजीपाला व फळे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. परंतु या अडचणीवर मुखेड तालुक्यातील लोणाळ येथील शेतकरी गट एकत्र येवून मात केली आहे. स्थानिक बाजारात टरबुजाला दर मिळत नसल्याने तेलंगणातील 

गटातील शेतकरी आले एकत्र 
लोणाळ (ता. मुखेड) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येवून ‘आत्मा’तंर्गत महात्मा फुले शेतकरी गटाची स्थापना केली. या गटाच्या माध्यमातुन निविष्ठा खरेदीसह शेतीमाल एकत्र विक्री करत शेतीमालाचे मुल्यवर्धन करण्याचा प्रयत्न कामील काही वर्षापासून केला जात आहे. यासाठी त्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, तालुका कृषी अधिकारी एस. बी. शितोळे, कृषी सहायक श्री. गिरी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील कृषी व्यवसाय व्यवस्थापक प्रमोद झरे यांचे मार्गदर्शन लाभते. यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी निर्माण झालेल्या अडचणीवर मात करता येत आहे.

हेही वाचा.....लॉकडाउनच्या काळात शेतमालाच्या दरात घसरण

लॉकडाउनमुळे फळांच्या दरात घसरण
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मागील चाळीस दिवसापासुन सुरु केलेला लॉकडाउनमुळे टरबुजाला बाजार मिळत नाही. व्यापारीही कमी दराने टरबुजाची मागणी करत आहेत. यामुळे लागवड खर्च निघने आवघड झाल्यामुळे लोणाळचे शेतकरी एकत्र येवून परराज्यात टरबुज विक्रीचा निर्णय घेतला. 

हेही वाचलेच पाहिजे..... शिक्षक सेनेने भरविला भुकेल्यांच्या तोंडी घास

युवा शेतकरी आले एकत्र
गटातील युवा शेतकरी नागनाथ चिमडगे, मारोती गराडे, संगम श्रीरामवर, सुनील गराडे व अंकुश इंगळे यांनी नवीन प्रयोग करत भाजीपाला पिकांसोबत यंदा टरबुजाची लागवड केली आहे. यात त्यांना विक्रमी उत्पादन मिळाले. पण लॉकडाउनमुळे विक्री करण्यास अडचण येत होती. यासाठी त्यांनी परराज्यात टरबुज विक्रीचा निर्णय घेतला.

करीमनगर येथे विक्री 
स्थानिक बाजारात भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येवून तेलंगणा राज्यातील करीमनगर येथे टरबुज पाठविण्याचा निर्णय घेतला. मालाची मोठी उपलब्धता व गुणवत्ता यावरून अनेक व्यापाऱ्यांनी मालाची मोठी उपलब्धता व गुणवत्ता यावरून अनेक व्यापाऱ्यांनी सहा ते साडेसहा रुपये किलो दराने खरेदी केली. पाच शेतकऱ्यांचा सव्वाशे ते दिडशे टन माल निघाला. . कलिंगडाच्या विक्री व व्यवस्थापनात तालुका कृषी अधिकारी, एस. बी. शितोळे व कृषी सहाय्यक श्री गिरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

वासवी माता जयंती घरीच साजरी करा 
आर्य वैश्य समाजाचे आराध्य दैवत माता वासवी कन्यका परमेश्वरी जयंती प्रतिवर्षी साजरी करण्यात येते. यावेळी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशपातळीवर लॉकडाऊन असल्याने महाराष्ट्रातील आर्य वैश्य समाज बांधवांनी ता. तीन मे रोजी आपल्या घरीच माता वासवी कन्यका परमेश्वरी जयंती अगदी साध्या पद्धतीने साजरी करून संपूर्ण विश्व कोरोनापासून मुक्त व्हावे यासाठी वासवी मातेला प्रार्थना करावी, असे आवाहन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार पुणे, उपाध्यक्ष दिलीपभाऊ कंदकुर्ते, ज्ञानेश्वर महाजन, सचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार, प्रसिद्धीप्रमुख प्रा. विजय बंडेवार, डॉ. विजय निलावार, प्रदीप कोकडवार, डॉ. संजय बुडकेवार, मार्गदर्शक एकनाथराव मामडे, डॉ. सूर्यकांत शिरपेवार औरंगाबाद व अनिल मनाठकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Farmer Group Overcame The Problem