Nanded News
Nanded News

नांदेड जिल्ह्यातील शेकऱ्यांनी एकत्रीत शेती करण्याची गरज : जिल्हाधिकारी डॉ. विपीन

Published on

नांदेड : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला सध्या दर मिळत नाही, अशी ओरड होत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रीत येवून शेती करण्याची गरज आहे. यातून सर्वांचाच फायदा होइल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले. 

कृषी विभागाकडून ‘विकेल ते पिकेल’ अभियानातंर्गत बुधवारी (ता. नऊ) नियोजन भवन येथे शेतकरी कंपनी व शेतकरी गटासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली. यामध्ये ते बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले की शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यशाळा घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा माल शहरामध्ये विकता यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदेच्या समोर शेतीमाल विक्रीची व्यवस्था करणार आहोत. जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांसोबत आहे असे सांगत शासनाच्या योजनेतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांनी नवीन पिकाचे नियोजन करताना आपल्या भागातील वातावरणाचा अभ्यास करावा असे आवाहनही डॉ. विपीन यांनी केले. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, नाबार्डचे जिल्हा उपप्रबंधक राजेश धुर्वे, ‘माविम’चे चंदनसिंग राठोड, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, माधव सोनटक्के, दिगंबर तपासकर, कापूस संशोधन केंद्राचे प्रा. अरविंद पांडागळे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. देविकांत देशमुख यासह सर्व तालुका कृषी अधिकारी, महिला बचतगट, ‘आत्मा’चे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. 

उत्पादित केलेल्या मालाला दर मिळत नाही 
जिल्ह्यातील ठराविक शेतकऱ्यांनाच योजनांचा फायदा होत आहे . लहान शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. यासाठी या कार्यशाळा बांधावर घेण्याची गरज आहे. इतर देशात शेतकरी एकत्र येऊन शेती करतात. असा प्रयोग आपल्याकडेही झाला पाहिजे. यामुळे सर्वांचा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला दर मिळत नाही; यात आपण कमी पडत असून शेतीमालाच्या पॅकिंगसह मार्केटींगकडे लक्ष दिले पाहिजे. 
- डॉ. विपीन, जिल्हाधिकारी नांदेड

भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा म्हणून आपण शेतीकडे पाहतो. जोपर्यंत शेतकऱ्यांना आपण ह्रदयाच्या जागी पाहणार नाही तोपर्यंत या कण्याला अर्थ येणार नाही, हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ह्रदयाची जागा घ्यायची असेल तर यापुढे ‘विकेल तेच पिकेल’ हा मंत्र घेऊन अधिकाधिक व्यावसायिक तंत्र जवळ करायला पाहिजे.
- वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com