esakal | शेतकऱ्याचा नाद खूळा : जीपलाच बनवले धान्य काढण्याचे मळणीयंत्र

बोलून बातमी शोधा

जीप मळणीयंत्र
शेतकऱ्याचा नाद खूळा : जीपलाच बनवले धान्य काढण्याचे मळणीयंत्र
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिवणी (ता. किनवट, जिल्हा नांदेड) : किनवट तालुक्यातील शिवणीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या झळकवाडी येथील आदिवासी तरुण देविदास डुकरे हा शेती व्यवसाय करतो. गेल्या चार पाच वर्षापासून शेती व्यवसाय साथ देत नसल्याने या युवकाने शेतीला जोडधंदा करण्याचे ठरवून त्यांनी एक जीप विकत घेतली. त्या जीपला भाडे मिळेल या आशेने घेतलेली जीप खेड्यात भाडे मिळत नसल्याने गाडी घरीच राहायची.

त्यामुळे हा तरुण निराश न होता एक धान्य काढण्याची हल्लर (मळणीयंत्र) विकत घेतले. हे हल्लर लहान असल्याने बैलाच्या साहाय्याने न्यावे लागायचे त्यामुळे वेळेवर बैल मिळत नसल्याने धान्य काढण्याचे कामे कमी प्रमाणात लागायची. कामे कमी प्रमाणात लागत असल्याने हा युवक निराश न होता त्याने एक युक्ती केली.

हेही वाचा - सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे शीख समाजांतर्गत कोविड रुग्णांसाठी विशेष मदत सेवाकेंद्र

त्या जिपची अर्धी बॉडी कापून बसण्यासाठी जागा व स्टेरिंग ठेवून या युवकांनी जीपवरच हल्लर बसवले. हे हल्लर चार चाकी असल्याने खरीप पिकांची काढणी त्यांनी रोडच्या बाजुच्या व जिथे गाडी जाईल या ठिकाणची धान्य काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला कमी पैसा मिळू लागला का तर ही गाडी चिखल असलेल्या शेतात नेता येत नव्हती. त्यामुळे रब्बी पिकाची मोठ्या प्रमाणात काढणी काढता आल्याने चार पैसे मिळु लागल्याणे हा युवक आता समाधानी असल्याचे सांगतो आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे