माहूर न्यायालय परिसरात दुसऱ्यांदा लागली आग; तब्बल एक तासांच्या कसरतीनंतर आगीवर यश

साजीद खान
Wednesday, 24 February 2021

नगर पंचायत अग्निशमन विभागा ने आग विझवण्यासाठी शर्तींचे प्रयत्न केल्याने तब्बल एक तासांच्या कसरतीनंतर आग विझवण्यात त्यांना यश आले आहे.   

माहूर ( जि.नांदेड) : माहूर येथील न्यायालया निकटच्या माळरान परिसरात आज बुधवार  (ता.२४) रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. त्यात परिसरातील झाडे आगीच्या विळख्यात सापडली. नगर पंचायत अग्निशमन विभागा ने आग विझवण्यासाठी शर्तींचे प्रयत्न केल्याने तब्बल एक तासांच्या कसरतीनंतर आग विझवण्यात त्यांना यश आले आहे.   

माहूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय लगतच्या परिसरात आग लागल्याची माहिती नगर पंचायतच्या मुख्याधिकारी विद्या कदम यांना मिळताच त्यांनी विनाविलंब नगर पंचायतीचे अग्निशामन दल घटनास्थळी रवाना केले. तोपर्यंत आग न्यायालयाच्या कंपाऊंड वॉलपर्यंत पोहचली होती. वाऱ्याच्या प्रवाहामुळे बघता- बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. मात्र वाऱ्याच्या झोताबरोबर सर्वत्र आग पसरू लागली. झपाट्याने पसरत असणाऱ्या आगीमध्ये अनेक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

यावेळी अग्निशमन विभागाच्या मदतीने नगर पंचायतचे कर्मचारी यांनी अग्निशमन वाहन जाण्यासाठी अडचण असताना ही कसोशीने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठे अनर्थ टळले. वन विभागाचे कर्मचारी आग संपुष्टात आल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचले हे विशेष. वनवा पेटल्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महिनाभरात ही दुसऱ्या वेळी न्यायालय परिसरात आग  लागल्याने न्यायालयातील महत्वपूर्ण दस्तऐवजाच्या सुरक्षेचा विचार करून न्यायालय  इमारत परिसरात जाळ रेषा आखनी करणे गरजेचे असून वनविभागने तातडीने जाळ रेषा आखनी करावी अशी मागणी तानू बिर्जे, जयकुमार अडकिने यांनी केली आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fire broke out for the second time in the Mahur court premises; Success on fire after a strenuous one hour workout nanded news