Sharad Pawar NCP : सर्व कार्यकर्त्यांसह मी शरद पवार यांच्यासोबत; माजी आमदार प्रदीप नाईक

माजी आमदार नाईक यांच्या या भूमिकेला किनवट मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखाने पाठिंबा जाहीर
Sharad Pawar NCP
Sharad Pawar NCP sakal

किनवट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी आपण शरद पवार यांच्यामुळेच मी तीन वेळा निवडून आलो आहे. त्यामुळे माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह मी पवार साहेबांसोबत कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे सांगून स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे.

माजी आमदार नाईक यांच्या या भूमिकेला किनवट मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखाने पाठिंबा जाहीर केल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी किनवट मतदारसंघाची जागा अतिमहत्वाची असून, श्री. नाईक हे सलग तीन वेळा येथून निवडून आले होते. २०१९ मध्ये मात्र त्यांना भाजपाचे आमदार भीमराव केराम यांच्या विरोधात निसटता पराभव स्विकारावा लागला होता.

परवा अजित पवार यांच्या बंडामुळे बरीच उलथापालथ होऊन कोण कुणाचा? असा संभ्रम तयार झालेला असताना श्री. नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Sharad Pawar NCP
Sharad Pawar : वय ८२ असो वा ९२ मला फरक पडत नाही; शरद पवारांनी स्पष्ट केले इरादे

शरद पवार यांनी धर्मनिरपेक्षता, समता, बंधुभाव या नितीद्वारे आजपर्यंत राजकारण केले असून, त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली किनवट माहूर मतदारसंघातील मतदारांनी मला सलग तीन वेळा कौल दिला आहे.

मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता, तो मी सार्थ ठरविण्यासाठी, लोकांच्या मतांचा आदर राखीत शरद पवारांच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे असल्याचे नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश राठोड, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे, माजी सदस्य मधुकर राठोड, विशाल जाधव, प्रवीण म्याकलवार, माजी नगराध्यक्ष अरुण आळणे व साजीद खान,

Sharad Pawar NCP
Nanded Crime : दारू पिऊन दगडसांगवी जिल्हा परिषद शाळेत गोंधळ; मुख्याध्यापकांना शिवीगाळ; गुन्हा दाखल

गटनेते जहिरोद्दीन खान, विधानसभा अध्यक्ष वैजनाथ करपुडे पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अनिल पाटील, विधानसभा युवक अध्यक्ष राहुल नाईक, गजानन मुंडे पाटील, युवाचे बालाजी बामणे, कचरू जोशी, श्रीकांत बोईंनवाड,

माजी नगरसेवक शेख अफरोज, कैलास भगत, हसनलाला, पंडित राठोड, शिवराम जाधव, प्रमोद राठोड, बंडू भुसारे, शहर उपाध्यक्ष गणेश राठोड आदींनी माजी आमदार नाईक यांनी जी भूमिका घेतली ती योग्य असून, यापुढेही आपण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणार असल्याचे जाहीर करून आपले समर्थन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com