esakal | नांदेड जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल! सोमवारी चार व्यक्ती कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेडची कोरोनामुक्तीकडे वाटचाल! सोमवारी चार व्यक्ती कोरोनाबाधित

आजच्या घडीला ५३ रुग्ण उपचार घेत असून एक बाधिताची प्रकृती अतिगंभीर आहे.

नांदेडची कोरोनामुक्तीकडे वाटचाल! सोमवारी चार व्यक्ती कोरोनाबाधित

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. सोमवारी (ता.१२) प्राप्त झालेल्या एक हजार ९८४ अहवालापैकी चार अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९१ हजार ३३२ एवढी झाली असून यातील ८८ हजार ७७५ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

हेही वाचा: नांदेड जिल्ह्यातील एक हजार गावांत नाही पोलिस पाटील

आजच्या घडीला ५३ रुग्ण उपचार घेत असून एक बाधिताची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

हेही वाचा: नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात;व्हिडिओ

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या एक हजार ९०६ एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये नांदेड महापालिका क्षेत्रात- तीन, कंधार तालुक्यांतर्गत-एक असे एकूण चार बाधित आढळले. जिल्ह्यातील सहा कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड एक, कंधार-दोन, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील-तीन व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हाभरात ५३ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.

हेही वाचा: नांदेड जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात; गर्दी टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

नांदेड कोरोना मीटर

एकूण पॉझिटिव्ह : ९१ हजार ३३२

एकूण कोरोनामुक्त : ८८ हजार ७७५

एकूण मृत्यू संख्या : एक हजार ९०६

सोमवारी पॉझिटिव्ह : चार

सोमवारी कोरोनामुक्त : सहा

सोमवारी मृत्यू : शून्य

उपचार सुरु : ५३

अतिगंभीर प्रकृती : एक

loading image