esakal | नांदेड जिल्ह्यातील एक हजार गावांत नाही पोलिस पाटील! कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड जिल्ह्यातील एक हजार गावांत नाही पोलिस पाटील

नांदेड जिल्ह्यात १६ तालुके असून जिल्ह्यात पोलिस पाटलांची एक हजार ७०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी ७०० पदे भरण्यात आली असून एक हजार गावांना अजूनही पोलिस पाटलांची प्रतिक्षा आहे.

नांदेड जिल्ह्यातील एक हजार गावांत नाही पोलिस पाटील

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : जिल्ह्यातील १६ तालुक्यातील आठ महसुली विभागांतर्गत (Revenue Department)
पोलिस (police) पाटलांच्या एक हजार ७०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक हजार पदे भरण्यास शासनाला अजूनही मुहूर्तच न सापडल्याने रिक्त असलेल्या गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा: नांदेड: गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक

नांदेड जिल्ह्यात १६ तालुके असून जिल्ह्यात पोलिस पाटलांची एक हजार ७०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी ७०० पदे भरण्यात आली असून एक हजार गावांना अजूनही पोलिस पाटलांची प्रतिक्षा आहे. ७०० कार्यरत पोलिस पाटलांमधून ५० निवृ्त्त झालेले आहेत. त्यामुळे ६५० पोलिस पाटलांना तीन-तीन गावचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे.

प्रत्येक गावासाठी प्रतिष्ठेची व मान सन्मानसोबतच गावातील तंटे गावातच सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजविणाऱ्या पोलिस पाटील पदासाठी प्रत्येक गावात स्पर्धा निर्माण झालेली असताना ही रिक्त पदे भरण्यासाठी शासन कानाडोळा करत आहेत. त्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभियानाला त्यामुळे साहजिकच हरताळ फासल्या जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एक हजार ५० पदे रिक्त असून या गावांच्या कायदा व सुव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत आहे.

हेही वाचा: नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात;व्हिडिओ

वास्तविक बघता पोलिस पाटील हा पोलिस प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा आहे. ते गावातील कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासोबतच अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनास मदत करत असतात. यासाठी रिक्त पदाचे ग्रहण लागलेल्या गावात भरती प्रक्रिया पुर्ण करून कायमस्वरुपी पोलिस पाटील देणे आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड, हदगाव, भोकर, किनवट, देगलूर, कंधार, बिलोली आणि धर्मबाद असे आठ महसुली विभाग आहेत.

हेही वाचा: नांदेड महापालिकेसमोर मालमत्ता करवसुलीचे आव्हान, थकबाकीदारांवर होणार कारवाई?

पोलिस पाटलांच्या रिक्त पदांमुळे अनेक गावात कायदा व सुव्यवस्था टिकविण्याची मोठी कसरत करावी लागत आहे. कार्यरत असलेल्या पोलिस पाटलांचे मानधन व वयोमर्यादा वाढ यासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी रिक्त पदे भरण्यासोबतच प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत.

- हेमंत गावंडे, पोलिस पाटील संघटना

पोलिस पाटलांच्या राज्यात सुमारे १३ हजार जागा रिक्त आहेत. त्यामुळे एका पोलिस पाटलांकडे तीन-तीन गावांचा अतिरिक्त भार आहे. त्याचा कायदा व सुव्यवस्था राखण्यावर परिणाम होत असून रिक्त जागा भराव्यात. तसेच कोरोनामुळे राज्यात सुमारे २५ पोलिस पाटलांचे निधन झाले असून, त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचा विमा शासनाने द्यावा.

- खंडेराव दुलबाजी बकाल, राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलिस पाटील असर्जन

loading image