नांदेडला ‘सुपर स्प्रेडर’च्या आजपासून होणार कोरोना चाचण्या

कोरोना चाचणी
कोरोना चाचणी

नांदेड : कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून नागरिकांनी अधिकाधिक दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या विविध शासकीय कार्यालयांसह सेवा क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर (IAS Vipin Itankar) यांनी सोमवारी (ता.२६) दिली. जिल्ह्यातील कोरोना (Nanded) स्थितीचा आढावा व संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन करावयाच्या उपाययोजनांबाबत आज विशेष बैठक झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. शासकीय कार्यालये, सेवावर्गात मोडणाऱ्या व्यावसायिकांचा (Corona Test) अधिकाधिक लोकांशी दररोज संपर्क येतो अशा व्यक्तींची सोळा वर्गवारीत विभागणी केली आहे. सर्वाधिक काळजी याच घटकापासून घेणे अत्यावश्यक असल्याने या सर्वांची कोरोना चाचणी युद्धपातळीवर करता यावी, या दृष्टीने ही विशेष मोहीम असल्याचे डॉ. विपिन यांनी स्पष्ट केले. ही मोहीम आज मंगळवारपासून (ता.२७) सुरु होईल व ११ ऑगस्टपर्यंत चालेल.(from today super spreader corona tests conduct in nanded glp88)

कोरोना चाचणी
औरंगाबादला दिलासा! हजार जणांच्या कोरोना चाचणीत सर्वच निगेटीव्ह

यासाठी आरोग्य विभागाचे विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. दररोज किमान पाच हजार सातशे चाचण्यांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. समन्वयातून ही मोहीम राबविली जाणार असून प्रत्येक विभागाला नेमून दिलेल्या तारखेप्रमाणे पथकामार्फत तपासणी केली जाईल. यात आरटीपीसीआरचे प्रमाण जास्त असेल. महापालिका क्षेत्रासाठी दररोज दोन हजार ३१० चाचण्यांचे उद्दिष्ट आहे. महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जमदाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com