Ganeshotsav 2022 : उत्कृष्ट मंडळाला मिळणार ‘गणराया अवाॅर्ड’

विजय कबाडे यांची माहिती; अर्धापूरला शांतता समितीची बैठक
Ganeshotsav 2022 Ganraya Award to best mandal Ardhapur
Ganeshotsav 2022 Ganraya Award to best mandal Ardhapur

अर्धापूर : दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर सण उत्सव साजरे करण्यात येत आहेत. हे सण उत्सव साजरे करत असताना शांततेत साजरे करत कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. जे कायद्याचे उल्लंघन करतील, त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी बुधवारी (ता. २५) दिला.

आगामी काळात साजरा करण्यात येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्याच्या पटांगणात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, तहसीलदार उज्वला पांगरकर, मुख्याधिकारी शैलेश फडसे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपकार्यकारी अभियंता अविनाश रामगिरवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अॅड किशोर देशमुख, कृष्णा देशमुख, संतोष गव्हाणे, भगवान कदम, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुसबीर खतीब आदी उपस्थित होते.

पोलीस निरिक्षक अशोक जाधव यांनी प्रास्ताविक करुन पोलिस प्रशासनाने सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तयारीची माहिती दिली व यंदा शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक तीन प्रथम, द्वितीय तृतीय पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी तहसीलदार पांगरकर, मुख्याधिकारी फडसे, मुसबीर खतीब यांनी मनोगत व्यक्त करून प्रशासनाच्या वतीने सहकार्य करून सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील याची ग्वाही दिली.

यावेळी कृष्णा देशमुख, प्रवीण देशमुख, नगरसेवक बाबुराव लंगडे, गजानन जोगदंड, विलास साबळे, दादाराव शिंदे, पत्रकार लक्ष्मीकांत मुळें यांनी विचार मांडले. सुत्रसंचलन निळकंठ मदने यांनी केले तर बळीराम राठोड यांनी आभार मानले. या‌ वेळी आर. आर. देशमुख, राजू शेटे, सुनिल देशमुख, सोनाजी सरोदे, गाजी काजी, शेख जाकेर, कपिल दूधमल, अशोक डांगे, उद्धवराव कल्याणकर, सदाशिव इंगळे, चंद्रमुणी लोणे अमोल डोंगरे, पंडित लंगडे, डॉ विशाल ल़ंगडे, व्यंकटी राऊत, उमेश सरोदे, मनोज इंगोले, शेख महेबुब, उल्लास देशमुख आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com