esakal | नांदेडमध्ये ‘गर्ल्स सेफ्टी मिशन’ लवकरच- एसपी प्रमोद शेवाळे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी घेतली पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळेंची भेट. 

नांदेडमध्ये ‘गर्ल्स सेफ्टी मिशन’ लवकरच- एसपी प्रमोद शेवाळे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील भरोसा सेलच्या पाठोपाठ आता महिला व युवतींच्या सुरक्षेसाठी लवकरच ‘गर्ल्स सेफ्टी मिशन’ हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. १६) रोजी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षाना सलगर यांनी पोलिस अधीक्षक यांची भेट घेतल्यानंतर श्री. शेवाळे यांनी त्यांना आश्‍वासन दिले. तसेच नांदेडच्या नागरिकांचे व त्यांच्या संपत्तीचे संरक्षण करणे नांदेड पोलिस दलाचे आद्यकर्तव्य असून नागरिकांनी सजग राहून समाजकंटकाची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन केले.  

जिल्ह्यातील मुली व महिलांच्या सुरक्षाविषयी चर्चा करुन काही सूचनाही करण्यात आल्या. महाविद्यालय परिसरात तसेच महिलांची गर्दी ज्या ठिकाणी जमा होते अशा ठिकाणी महिला पोलिसांची गस्त वाढविली पाहिजे. जेने करुण छेडछाड करणाऱ्यांवर वचक बसेल. आणि प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये तक्रार पेटीची सुविधा करावी. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीसाठी शस्त्र प्रदर्शन ठेऊन त्यांना स्वसंरक्षणासाठी या शस्त्रांची माहिती द्यावी. जेणेकरुन छेडछाड करणाऱ्या मुलांना त्यांची जागा दाखवून देण्यास मुली मागे राहणार नाहीत.

हेही वाचा - कोरोना : शिक्षकांना गृहभेटीसाठी बंधनकारक करू नये, संघटनेची अफलातून मागणी -

यांची होती उपस्थिती 

तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे यासह आदी महत्वाच्या विषयावर चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश राज्य सरचिटणीस पल्लवी तारडे पाटील, औरंगाबादच्या युवती अध्यक्षा तथा नगरसेविका अंकीता विधाते, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष कन्हैय्या कदम यांची उपस्थित होती.

नांदेड शहर हे शिक्षणाचे ‘हब’ 

यावेळी महिलांच्या सुरक्षा व संरक्षणासाठी पोलिस दल सक्षम असून अगोदरपासून दामिनी पथक कार्यरत आहे. तसेच भरोसा सेलच्या माध्यामातून अनेक पिडीत महिला, युवतीना आधार दिला आहे. जिल्ह्यातील पोलिस ठाणे स्तरावर सुरु असलेल्या भरोसा सेलचे काम योग्य रितीने होत असल्याचे निर्दर्शनास आले. नांदेड शहर हे शिक्षणाचे हब होत असल्याने राज्यातील विविध भागातून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनी वैद्यकिय व अभियांत्रीकी शिक्षणासाठी येतात. ज्या भागात खासगी शिकवणी वर्ग आहेत तसेच महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यीनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांची गस्त व सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. अनेक रोडरोमीयोवर कारवाई करुन त्यांना समज देऊन प्रतिबंध करण्यात आले आहे. 

येथे क्लिक करानांदेडकरांना दिलासा : कोरोना बाधितांच्या संख्येत आणि मृत्यूदरात घट -

‘गर्ल्स सेफ्टी मिशन’ लवकरच सुरु करणार

शहरात व जिल्ह्यात मुलींना व महिलांना सुरक्षीत वाटेल असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी महिलांचा जास्त वावर आहे अशा ठिकाणी महिला पोलिस अधिकारी यांची गस्त सुरु करण्यात आली आहे. सध्या कोवीडची साथ असल्याने शाळा महाविद्यालयासह खासगी शिकलवणी वर्गही बंद आहेत. त्यामुळे बाहेरगावची मंडळी सध्या शहरात वास्तव्यास नाहीत. तरीसुध्दा पोलिसांची गस्त सुरु आहे. येणाऱ्या काळात ‘गर्ल्स सेफ्टी मिशन’ लवकरच सुरु करणार असल्याचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले.