नांदेड : एटीएमच्या समावेशमुळे गोदावरी अर्बनची आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल

Nanded News
Nanded News

नांदेड : गोदावरी अर्बनने  ‘एटीएम’ची सुरवात करीत आधुनिक तंत्रज्ञांन अंगीकारुन आर्थिक क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकले आहे. यापुढेही ग्राहकांना दर्जेदार सुविधा देण्याचा सातत्याने प्रयत्न करावा असे मत  संस्थापक अध्यक्ष तथा हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांनी केले.
 
खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोदावरी अर्बनच्या एटीएम सुविधेचा शुभारंभ सोमवारी (ता.१४) झाला. त्यावेळे खासदार पाटील बोलत होते. दरम्यान , दिनदर्शिका २०२१चे प्रकाशन आणि नांदेड पोलिस दलाला ट्रॅफिक बॅरिगेट्‍सचे वाटपही यावेळी करण्यात आले. गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, उपाध्यक्षा हेमलता देसले, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, वजिराबाद वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे, वैधानिक लेखापारीक्षक जीवन लाभशेटवार, संचालक रवींद्र रगटे, प्रा. सुरेश कटकमवार, वर्षा देशमुख, प्रसाद पाटील महल्ले, यशवंत सावंत, अशोक देसले, अजय देशमुख सरसमकर, मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे उपस्थित होते. 

कार्यक्षमता वाढविण्यासाठीचा प्रयत्न
खासदार हेमंत पाटील म्हणाले की, सहकार क्षेत्रात गोदावरी अर्बनने अवघ्या आठ वर्षाच्या कारकिर्दीत आपल्या ग्राहकांना दर्जेदार आणि अत्याधुनिक सुविधा देऊन देशातील महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटका व गुजरात या पाच राज्यात विस्तार वाढविला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काळानुरूप आपल्या बँकिंग सुविधांमध्ये सातत्याने बदल केले आहेत. संस्थेच्या पहिल्या दिवसापासूनच ऑनलाइन सुविधा दिल्यानंतर आजच्या डिजीटल युगामध्ये स्वतःला समृद्ध करण्यासाठी मोबाईल बँकिंगची सुरवात केली.  आता इतर राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे सुविधा देऊन कार्यक्षमता आणखी दर्जेदार करण्यासाठी ‘एटीएम’ची सुरवात केली आहे.

ग्राहकांचा विश्वास केला संपादन
ग्राहकांना सर्व सुविधा एका क्लिकवर आणि ऑनलाइन मिळाव्यात यासाठी गोदावरी सतत प्रयत्नशील असते. या सर्वांमध्ये ग्राहकांची साथ आणि विश्वास खूप महत्वाचा आहे आणि तो सातत्याने गोदावरी अर्बनला मिळाला आहे. एटीएम सुविधा देवून सर्वसामान्य लोकांना त्यांची पत निर्माण करून सक्षम करण्याचे काम केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील इतर क्षेत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत असताना गोदावरीचे सहकार क्षेत्रातील कार्य, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या ठेवी आणि ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. 

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन पाऊल
आज आम्ही तंत्रनाज्ञाच्या कक्षेत ‘एटीएम’च्या रूपाने नवीन पाऊल टाकत आहोत. यावरून आम्हाला आता खात्री झाली आहे की, आम्ही आता कोणतेही काम हाती घेतले तर ते पूर्णत्वास नेऊ. प्रत्येक गोदावरीच्या कर्मचाऱ्याला अभिमान वाटावा  असे काम आजवर केले आहे. 
- राजश्री पाटील, अध्यक्षा (गोदावरी अर्बन)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com