esakal | गुड न्यूज : दमरेकडून 10 विशेष गाड्यांना मुदतवाढ, वेळेतही बदल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी रेल्वेविभागाकडून देण्यात आलेल्या सुचनांचा आदर करुन आपला सुरक्षीत प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

गुड न्यूज : दमरेकडून 10 विशेष गाड्यांना मुदतवाढ, वेळेतही बदल

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : प्रवाशांच्या सुविधेकरिता दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातून विशेष गाड्या चालवत आहे. यापैकी 10 विशेष गाड्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे. या सर्व रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी रेल्वेविभागाकडून देण्यात आलेल्या सुचनांचा आदर करुन आपला सुरक्षीत प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
 

 • गाडी संख्या 07614 नांदेड ते पनवेल विशेष गाडी ता. 31 डिसेंबर 2020 ते 19 जानेवारी 2021 दरम्यान रोज धावेल.
 • गाडी संख्या 07613  पनवेल ते नांदेड विशेष गाडी ता. एक जानेवारी 2021 ते 20 जानेवारी 2021 दरम्यान रोज धावेल.
 • गाडी संख्या 07049 हैदराबाद ते औरंगाबाद विशेष गाडी ता. 31डिसेंबर 2020 ते ता. 19 जानेवारी 2021 दरम्यान रोज धावेल.  
 • गाडी संख्या 07050 औरंगाबाद ते हैदराबाद विशेष गाडी ता. एक जानेवारी 2021 ते 20 जानेवारी 2021 दरम्यान रोज धावेल.
 • गाडी संख्या 02765 (द्वी- साप्ताहीक) तिरुपती ते अमरावती विशेष गाडीता. ता. दोन जानेवारी 2021 ते ता. 16 जानेवारी 2021दरम्यान दर मंगळवार आणि शनिवार रोज धावेल.
 • गाडी संख्या 02766  (द्वी- साप्ताहीक) अमरावती ते तिरुपती विशेष गाडी ता. चार जानेवारी 2021 ते 18 जानेवारी 2021 दरम्यान दर गुरुवार आणि सोमवारी रोज धावेल.
 • गाडी संख्या 02720  (द्वी- साप्ताहीक) हैदराबाद ते जयपूर विशेष गाडी ता. 30 डिसेंबर 2020 ते 18 जानेवारी 2021 दरम्यान दर सोमवार आणि  बुधवार रोज धावेल.
 • गाडी संख्या 02719 (द्वी-साप्ताहीक) जयपूर ते हैदराबाद विशेष गाडी दिनांक 01.01.2021  ते 20.01.2021    दरम्यान  दर बुधवार आणि शुक्रवार रोज धावेल.
 • गाडी संख्या 07610 (साप्ताहीक) पूर्णा  ते पटना विशेष गाडी ता. 31 डिसेंबर 2020  ते 14 जानेवारी 2021 दरम्यान दर गुरुवारी रोज धावेल.
 • गाडी संख्या 07609 (साप्ताहीक) पटना ते पूर्णा विशेष गाडी ता.  दोन जानेवारी 2021 ते 16 जानेवारी २021 दरम्यान दर शनिवार रोज धावेल.
 •  

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यातील ३४ वाळू घाटांचा लिलाव लवकरच - जिल्हाधिकारी डॉ. विपीन

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य  सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.