esakal | गुड न्यूज : ‘ते’ ३१ रुग्ण आज जाणार घरी
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

मागील दहा दिवसांपासून या रुग्णांना कोरोना आजाराची कुठलीही लक्षणे आढळून न आल्याने गुरुवारी (ता.१४ मे) सुमारे ३१ रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश सिंह बिसेन यांनी दिली.  

गुड न्यूज : ‘ते’ ३१ रुग्ण आज जाणार घरी

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जागतीक आरोग्य संघटनेच्या वतीने `कोरोना’ बाधीत रुग्णांविषयी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार उपचार घेत असलेले संशयित व कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण यांना दहा दिवसांपर्यंत कुठलीही लक्षणे नसल्यास त्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये अडकवून न ठेवता घरी सोडण्यात येणार आहे.

नांदेडमध्ये (ता. तीन मे) पूर्वी पॉझिटिव आलेल्या रुग्णांवर विष्णुपुरी शासकीय रुग्णालय व एनआरसी यात्री निवास येथे उपचार सुरु आहेत. परंतु मागील दहा दिवसांपासून या रुग्णांना कोरोना आजाराची कुठलीही लक्षणे आढळून न आल्याने गुरुवारी (ता.१४ मे) सुमारे ३१ रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश सिंह बिसेन यांनी दिली.  

नांदेडकरांना मिळाला दिलासा

शहरात (ता.२२ एप्रिल २०२०) पहिला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण पीरबुऱ्हाणनगर येथे आढळून आला होता. त्यानंतर अबचलनगरच्या ६४ वर्षीय व्यक्तीस व सेलू येथील एका महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आतापर्यंत २३ दिवसांत जिल्ह्यातील कोरणा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३ वर पोहोचली, असून यातील पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोन कोरोना बाधीत रुग्णांचा नेमका पत्ता मिळत नसल्याने दोघेजन अजूनही फरारच आहेत. बाधित रुग्णांपैकी अबचलनगर येथील एका रुग्णाचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याला मंगळवारी (ता.१२ मे २०२०) रात्री उशीरा घरी सोडण्यात आले.

हेही वाचा- यामुळे जिल्ह्यातील ‘डेंगी’ आजारी रुग्णसंख्या झाली कमी

त्यांना घरी कधी सोडणार

विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय आणि एनआरआय यात्री निवास येथे उपचार घेत असलेल्या ३१ रुग्णांना दहा दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला व घशातील खवखव अशी कुठलीच लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यांना गुरुवारी (ता.१४ मे) कोरोना केअर सेंटरमध्ये अडकवून न ठेवता घरी सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मात्र, त्यांना घरी कधी सोडणार याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळू शकली आहे.  

हेही वाचा- मुलीला पाठविले बाहेर, केला तिच्या मैत्रीणीवर अत्याचार

२४ रुग्णांंचीही लवकरच होणार सुटका 

कोरोनाची कुठलीही लक्षणे नसलेल्या ३१ रुग्णांना घरी सोडण्यात येणार असले तरी, त्यांना आठवडाभर होम क्वॉरंटाईनमध्येच राहावे लागणार आहे. या काळात त्यांना काही लक्षणे आढळुन आल्यास पुन्हा रुग्णालयात बोलावण्यात येईल. सध्या संशयित म्हणून व कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची दिवसातून दोन वेळा तपासणी करण्यात येत असून, त्यांचे सुक्ष्म निरिक्षण करण्यात येत आहे. दरम्यान त्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणं आढळून न अल्यास लवकरच इतर २४ रुग्णांना देखील कोरोना केअर सेंटरमधुन सुटका करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
 

loading image