गुड न्यूज :  नांदेड जिल्ह्यातील पावणेदोन लाख शेतकऱ्यांना कर्ज माफीचा फायदा

प्रल्हाद कांबळे
Saturday, 17 October 2020

शासनाने महात्मा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत कर्ज माफी दिली. याचा फायदा जिल्ह्यातील एक लाख ७३ हजार २४० शेतकऱ्यांना मिळाला.

नांदेड : जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवत खरीप हंगाम हिरावून नेला. कर्ज काढून शेतात महागामोलाचे बियाणे खरेदी करुन पेरणी केली. सुरवातीला पावसाने दमदार सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी आनंदीत होता. मात्र मुग, सोयाबीन आणि कापूस काढणीला येताच परतीच्या पावसाने हैदोस घातला. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठ संकट उभे राहिले. शासनाने महात्मा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत कर्ज माफी दिली. याचा फायदा जिल्ह्यातील एक लाख ७३ हजार २४० शेतकऱ्यांना मिळाला.

मात्र चालू खरीप हंगाम हातातून गेल्याने नैराश्‍य कायम आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ता. २७ डिसेंबर २०१९ मध्ये निमित्त सुरु केली. ता. एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पिक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत घेतलेल्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, पुन्हा पूरर्गठन केलेल्या कर्ज मधील ता. ३० सप्टेंबर २०१९ रोजी दोन लाखापर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

हेही वाचाखासगी कोविड सेंटर बंद होण्याच्या मार्गावर, रुग्णसंख्या घटल्याचा परिणाम; शुक्रवारी १०५ पॉझिटिव्ह

दोन लाख सात हजार शेतकऱ्याची पोर्टलवर माहिती

जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख १४ हजार४९१ शेतकरी कर्ज मुक्तीसाठी पात्र आहेत. त्यापैकी बँकांनी दोन लाख सात हजार ६१७ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. या बँकांनी अपलोड केलेल्या माहितीपैकी कर्जमाफी पात्र असणाऱ्या एक लाख ८३ हजार ३४४ शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी एक लाख ७६ हजार २३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांपैकी एक लाख ७३ हजार २०५ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम एक लाख १८ हजार ८१३ लाख रुपये जमा करण्यात आले आहे. 

येथे क्लिक करा - दहा एकर सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरविले रोटाव्हेटर

खरीप गेला आता रब्बीही जाणार की काय 
 
उर्वरित आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्‍यांच्या बँक खात्यात शासनामार्फत कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात येत आहे. मिळालेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला. परंतु सप्टेंबरमध्ये सुरू झालेल्या परतीचा पाऊस शेतकऱ्यांची काही पाठ सोडेना. प्रारंभी मूग, उडीद त्यानंतर आता सोयाबीन, ज्वारीलाही जागेवरच मोड फुटले आहे. त्यानंतर आलेल्या कापूसही पावसामुळे काळवंडला असून येणाऱ्या काळात अजून हातचे रब्बी जाते की काय या चिंतेत शेतकरी वावरत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news: Debt waiver benefits to 1.75 lakh farmers in Nanded district nanded news