esakal | खासगी कोविड सेंटर बंद होण्याच्या मार्गावर, रुग्णसंख्या घटल्याचा परिणाम; शुक्रवारी १०५ पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गुरुवारी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी (ता. १६) प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या ८९६ अहवालापैकी ७६२ निगेटिव्ह, १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू, तर २०९ रुग्णांनी कोरोनावर मात

खासगी कोविड सेंटर बंद होण्याच्या मार्गावर, रुग्णसंख्या घटल्याचा परिणाम; शुक्रवारी १०५ पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - लाखो रुपये खर्च करुन शहरात जवळपास १५ खासगी कोविड सेंटर उभारण्यात आले होते. त्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या तज्ञ डॉक्टरांना गलेलठ्ठ पगार देण्यात आला होता. मात्र मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत अचानक घट झाल्याने पाच खासगी कोविड सेंटर बंद करण्याची वेळ खासगी कोविड सेंटर चालकावर ओढावली असल्याचे समजते. 

गुरुवारी तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी (ता. १६) प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या ८९६ अहवालापैकी ७६२ निगेटिव्ह, १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू, तर २०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

हेही वाचले  पाहिजे- ‘रेमडेसिव्हीर’चा साठा करायचा कुणाच्या भरवशावर, रुग्णसंख्या घटली, दोन मेडिकलवर आजपासून स्वःस्तात ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन

कोरोना रुग्ण संख्या अचानक घट
 
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यासाठी जागा शिल्लक नव्हती, त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने खासगी कोविड सेंटर सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोना रुग्ण संख्या अचानक घटल्यामुळे कोट्यावधींचा खर्च करुन कोविड सेंटर उभारलेल्या डॉक्टरांची चांगलीच गोची झाली. 

हेही वाचा- नांदेडमध्ये ‘गर्ल्स सेफ्टी मिशन’ लवकरच- एसपी प्रमोद शेवाळे ​

१०५ जण पॉझिटिव्ह

शुक्रवारी तरोडा नाका नांदेड पुरुष (वय ५२), गणराजनगर नांदेड पुरुष (वय ६३), भासवार चौक नांदेड महिला (वय ६५), हदगाव महिला (वय ६०), इतवारा नांदेड महिला (वय ६८), दुर्गानगर अर्धापूर पुरुष (वय ६२), वाळकी बाजार हदगाव महिला (वय ७५) या सात बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ४७६ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारच्या अहवालात नांदेड मनपा क्षेत्रात - ६४, नांदेड ग्रामीण- पाच, अर्धापूर-दोन, हिमायतनगर-एक, किनवट- दोन, हदगाव- दोन, नायगाव- एक, लोहा- चार, भोकर- तीन, बिलोली- एक, माहूर- एक, मुखेड- चार, मुदखेड- एक, धर्माबाद-सहा, हिंगोली- तीन, परभणी- तीन असे १०५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

कोरोना मीटर ः 

शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह- १०५ 
शुक्रवारी कोरोना मुक्त- २०९ 
शुक्रवारी मृत्यू- सात 
एकूण पॉझिटिव्ह -१७ हजार ८९७ 
एकूण कोरोनामुक्त-१५ हजार ६०१ 
एकूण मृत्यू- ४७६ 
उपचार सुरू - एक हजार ७०९ 
गंभीर रुग्ण- ४७ 
अहवाल बाकी- ३४४