शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : हवामानावर आधारित फळपिक विमा योजना लागु

प्रल्हाद कांबळे
Saturday, 10 October 2020

या योजनेंतर्गत सन 2020 हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या फळपिकांना अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान, आर्द्रता, वेगाचा वारा व गारपीट या हवामान धोक्यापासुन संरक्षण मिळणार आहे.

नांदेड : हवामानावर आधारित फळपिक विमा योजना ही नांदेड जिल्हयात केळी, आंबा, मोसंबी या पिकांसाठी लागु केली आहे. या योजनेंतर्गत सन 2020 हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या फळपिकांना अवेळी पाऊस, कमी- जास्त तापमान, आर्द्रता, वेगाचा वारा व गारपीट या हवामान धोक्यापासुन संरक्षण मिळणार आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्ता रक्कम भरुन पिक संरक्षित करणे आवश्यक आहे.

केळी फळपिकासाठी

विमा संरक्षित रक्कम नियमित एक लाख 40 हजार रुपये तर गारपीटसाठी 46 हजार 667 रुपये एवढी आहे. तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित सात हजार रुपये तर गारपीट दोन हजार 333 रुपये आहे. हा विमा हप्ता भरण्याचा शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2020 आहे.

आंबा फळपिकासाठी

विमा संरक्षित रक्कम नियमित एक लाख 40 हजार रुपये तर गारपीट 46 हजार 667 रुपये एवढी आहे. तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित सात हजार रुपये तर गारपीट दोन हजार 333 रुपये आहे. हा विमा हप्ता भरण्याचा शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2020 आहे.

हेही वाचा -  नांदेड : सासरच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या -

मोसंबी फळपिकासाठी

विमा संरक्षित रक्कम नियमित 80 हजार रुपये तर गारपीट 26 हजार 667 रुपये एवढी आहे. तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित चार हजार रुपये तर गारपीट एक हजार 333 रुपये आहे. हा विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2020 आहे.

ही योजना नांदेड जिल्ह्यात महसुल मंडळांना लागू राहिल

अधिसुचित केळी फळपिकासाठी

नांदेड तालुक्यात तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी. अर्धापुर तालुक्यात अर्धापुर, दाभड, मालेगाव. मुदखेड तालुक्यात मुदखेड, मुगट, बारड. लोहा तालुक्यात शेवडी बा. हदगाव तालुक्यात हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी. भोकर तालुक्यात भोकर. देगलुर तालुक्यात मरखेल, हाणेगाव. किनवट तालुक्यात किनवट, इस्लापुर, शिवणी, बोधडी. उमरी तालुक्यात उमरी तर नायगाव तालुक्यात बरबडा ही मंडळे आहेत.  

येथे क्लिक करा - नांदेड : आपल्या हक्कांसाठी दिव्यांग उतरणार रस्त्यावर, काय आहेत मागण्या ? -

आंबा पिकासाठी ही मंडळे

आंबा फळपिकासाठी अर्धापुर तालुक्यात दाभड, पाळेगाव. कंधार तालुक्यात कंधार, मुखेड तालुक्यात मुक्रामाबाद. तर मोसंबी फळपिकासाठी अर्धापुर तालुक्यात मालेगव. नांदेड तालुक्यात लिंबगाव, विष्णुपुरी तर मुदखेड तालुक्यात बारड या अधिसुचित महसूल मंडळाचा यात समावेश आहे.

नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा

प्रधानमंत्री फसल बिमा योजना हवामानावर आधारित फळपिक विमा आंबिया बहारमध्ये वरील अंतिम तारखेपुर्वी जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी व नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for farmers: Weather based fruit crop insurance scheme implemented nanded news