Good News : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार, आमदार केराम यांना यश

साजीद खान
Friday, 11 September 2020

माहूर,किनवट सह राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कार्यरत कर्मचारी यांना शासन सेवेत कायम समावून घेण्याच्या मागणीला अखेर किनवट चे आ.भीमराव केराम यांच्या पाठ पुरव्यामुळे मूर्तरूप येणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहे.

वाई बाजार (ता. माहूर) : मागील अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयाला अखेर आमदार भिमराव केराम यांच्या पाठपुराव्यामुळे मूर्तरूप येणार असल्याचे संकेत (ता. नऊ) रोजी पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी निर्गमित केलेल्या पत्रकामुळे मिळाले असून पणन मंत्री जयंत पाटील यांनी या संदर्भात बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

माहूर, किनवटसह राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कार्यरत कर्मचारी यांना शासन सेवेत कायम समावून घेण्याच्या मागणीला अखेर किनवटचे आ.भीमराव केराम यांच्या पाठपुरव्यामुळे मूर्तरूप येणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहे.

हेही वाचा खुशखबर! या क्षेत्रात तब्बल 5 कोटी रोजगाराच्या संधी -

पणन मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्यासह श्री. आबासाहेब पाटील,मराठा क्रांती ठोक मोर्चा प्रमुखयांच्या पत्रावर झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने सहकार व पणन मंत्री ना.जयंत पाटील यांनी अनुकूल असल्याचे दर्शवित तातडीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

पणन सहसंचालकांचे पत्र...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समावून घेणे बाबत (ता.२१) सप्टेंबर रोजी पणन संचालक पुणे तिसरा मजला यांचे दालनात दुपारी दोन वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पणन संचालकांच्या मान्यतेने विनायक कोकरे सहसंचालक पणन यांनी या बैठकीचे प्रती कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे,कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकार संघ पुणे,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ पुणे,श्री.आबासाहेब पाटील मराठा क्रांती ठोक मोर्चा प्रमुख,उपोषण कृती समिती पदाधिकारी समिती औरंगाबाद व किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांना पाठविण्यात आले आहे.

येथे क्लिक करा स्कुलबस मालक व चालकांवर नैराश्याचे सावट -

आमदार भीमराव केराम यांच्या पाठपुराव्याला यश

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी पणन मंत्री नामदार जयंत पाटील यांना  ता.२१ जुलै व १९ ऑगस्ट असे सलग दोन पत्र पाठवले होते. या पत्राची दखल घेऊन पण या मंत्र्यांनी या संदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिल्यानंतर किनवट तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद संचारला असून आ.केराम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन त्यांना शासन सेवेत समावले जाईल अशी आशा पल्लवित झाली असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good News: Govt to accommodate employees of Agricultural Produce Market Committee, success to MLA Keram nanded news