Good News- कायाकल्पचा पुरस्कार नांदेडच्या स्त्री रुग्णालयाला

प्रल्हाद कांबळे
Thursday, 22 October 2020

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा मिशन कायाकल्प पुरस्कार मिळाल्याबद्दल स्त्री रुग्णालय, शाम नगरचे अधीक्षक डॉ. भारत संगेवार यांचे स्वागत करतांना, बावरी नगरचे अधीक्षक गोविंद उबाळे, डॉ. आर्चना बजाज, डॉ. सुवर्णा स्वामी, पी. ससाणे, उर्मिला जाधव, वैशाली चौदंते, स्वाती देशमुख इत्यादी दिसत आहेत.

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कायाकल्प मिशनतंर्गत उच्चश्रेणी पुरस्कार नांदेडच्या शाम नगर येथील स्त्री रुग्णालयास जाहीर झाला असून त्याची घोषणा डॉ. विजय कंदेवार, सहसंचालक तंत्र राष्ट्रीय आरोग्य मिशन , मुंबई यांनी दिनांक 13 सप्टेंबर, 2020 रोजी जाहीर केला असल्याची माहिती स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भारत संगेवार यानीं दिली.

कायाकल्प राष्ट्रीय आरोग्य मिशनतंर्गत स्त्री रुग्णालयाचा संपूर्ण सर्व्हे केला जातो, येथे येणाऱ्या स्त्री रुग्णांची कशा प्रकारे देखभाल केली जाते. त्यांना वेळेवर पुरक आहार व परिसर स्वच्छता वेळेवर औषधोपचार दिले जातात कि नाही याचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतरच या पुरस्कारासाठी महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य मिशनतंर्गत निवड केली जाते. या मिशनतंर्गत स्त्री रुग्णालय, शाम नगर यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर , डॉ. मुद्दाम, डॉ. केंद्रे यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

हेही वाचा -  मुदखेड सिआरपीएफ केंद्रात पोलिस स्मृती दिवस साजरा -

यांची होती उपस्थिती

डॉ. संगेवार पुढे म्हणाले की, या पुरस्कारासाठी डॉ. अर्चना बजाज, डॉ. सुवर्णा स्वामी, पर्यवेक्षिका पी. पी. ससाणे, आनिता राठोड, उर्मिला जाधव, मांगीलवार रेखा, चौदंते विषारी, तेजस्विनी पडघणे, सोनी तेलंगे, पद्मिनी शिंदे, वैशाली सारंग, स्वाती देशमुख, गोस्वामी रत्नमाला, घोगरे आर.एम., नंदा नरवाडे, पद्माकर मोडके, सिमा मुंडकर आदिंचे परिश्रम लाभले आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good News-Rejuvenation Award to Nanded Women's Hospital nanded news