esakal | Good News:अर्धापूरच्या अमोल सरोदेच्या कार्याची युनिसेफने घेतली दखल, कोरोना काळात केले उत्कृष्ट काम
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या सदरात अर्धापूरचा रहिवाशी तथा स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचा रासेयो स्वयंसेवक अमोल सरोदे याने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या कार्याची दखल घेतली आहे. त्यांची निवड करण्यात आल्यामुळे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Good News:अर्धापूरच्या अमोल सरोदेच्या कार्याची युनिसेफने घेतली दखल, कोरोना काळात केले उत्कृष्ट काम

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : कोरोना काळात अडचणीत सापडलेल्यांना अनेकांनी अनेकपरीने मदत केली. त्यात कॉलेज युवक- युवती सर्वात पुढे होते. एनएसएस म्हणजेच राष्ट्रीय सेवा योजना यामध्ये सहभागी असलेल्या मुलांनी कोरोना सुरु झाल्यापासून स्वयंसेवक म्हणून काम सुरु केलं, ते आजही सुरुच आहे. या मुला- मुलींनी केलेल्या कामाच्या, मदतीच्या नोंदी युनिसेफने नवी उमेद- धडपडणारी मुले या सदरात सुरू केल्या आहेत.

या सदरात अर्धापूरचा रहिवाशी तथा स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचा रासेयो स्वयंसेवक अमोल सरोदे याने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या कार्याची दखल घेतली आहे. त्यांची निवड करण्यात आल्यामुळे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोविड- १९ च्या रुपाने मानवी समाजावर आपत्ती आली. या प्रादुर्भावामुळे शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या काळात अमोल सरोदेने अर्धापूर शहरासह नांदेड शहरातसुध्दा विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्य केले. त्यामध्ये प्रामुख्याने कोरोना जनजागृती पथनाट्य लिहून सादर केले आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित, रक्तदान शिबीर आयोजन, फेस मास्क शील्ड वाटप, गरजु, निराधार कुटुंबांना अन्नदान व आवश्यक साधन सामुग्री वाटप, हात धुण्याबाबत जनजागृती, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ प्रोत्साहन, ज्ञानगंगा आपल्या दारी उपक्रम, पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण, आरोग्य सेतू ॲप जनजागृती, पक्षी संरक्षण संकल्प अभियान, रक्तदान आणि प्लाझ्मा दान अभियान, माझे कुटुंब माझी जबाबदारी, अशा विविध सामाजिक उपक्रम कोरोना योध्दा म्हणुन राबविले. 

हेही वाचानांदेड : शेतात काम करणाऱ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पाच जण जखमी ; १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; लोहा शहरातील घटना -

अमोलने स्वतः ची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना काळातील भयावह परिस्थितीत लोकांमध्ये कोरोना विषयक जनजागृती केली. अमोलच्या या कार्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. अमोल सरोदेच्या या कार्याची दखल युनिसेफ इंडियाने सुरु केलेल्या नवी उमेद- धडपडणारी मुले या सदरात घेतली आहे. अमोलच्या या कार्याबद्दल अर्धापूरच्या नावलौकिकात भर पडली आहे. या यशाबद्दल अमोल सरोदेचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
 

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image