नांदेड : ग्राहक आयोगामार्फत दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या पूर्ततेसाठी शासनाने कठोर पावले उचलण्याची गरज- देवसरकर

प्रल्हाद कांबळे
Monday, 28 December 2020

नांदेड ग्राहक आयोगाचे अध्यक्ष किशोरकुमार देवसरकर यांनी ग्राहक दिनाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित वेबिनारद्ग्रारे कार्यक्रमात  ग्राहक संरक्षण कायदा 2019 बद्दल माहिती देताना ते बोलत होते.

नांदेड- ग्राहक कायदा 1986 तील बदल करून ग्राहक कायदा 2019 केंद्र सरकारने लागू केला असला तरी या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कायद्याच्या अनुषंगाने जिल्हा ग्राहक आयोगामार्फत दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणीच्या पूर्ततेसाठी शासनातर्फे कठोर पावले उचलावी. असे प्रतिपादन नांदेड ग्राहक आयोगाचे अध्यक्ष किशोरकुमार देवसरकर यांनी ग्राहक दिनाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित वेबिनारद्ग्रारे कार्यक्रमात  ग्राहक संरक्षण कायदा 2019 बद्दल माहिती देताना ते बोलत होते. 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात ता. 24 डिसेंबर गुरुवार दुपारी एक वाजता राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त वेबिनारद्वारे प्रबोधनात्मक कार्यक्रमात, "ग्राहक पंचायत महाराष्ट्र माहिती व कार्य दिशा" या पुस्तकाचे विमोचन नांदेड जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष किशोरकुमार देवसरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, याप्रसंगी नांदेड जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय लाड, संघटनेचे प्रबोधन प्रमुख बा. दा. जोशी, जिल्हाध्यक्ष अरविंद बिडवई व जिल्हा संघटक इंजि. बालाजी लांडगे यांची उपस्थिती लाभली.

हेही वाचा - Video -  सलग सुट्ट्यांमुळे रेणुका गडावर भक्तांची मांदियाळी, कोरोना पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स पालन! -

याप्रसंगी कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा पुरवठा अधिकारी श्री लतीफ पठाण यांनी केले. डॉ. विजय लाड यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त, ग्राहक संरक्षण कायदा- 1986, तयार होण्यामागे ग्राहक तीर्थ बिंदू जोशी यांची तळमळ, समाजातील दीन-दुबळ्या पीडित जनसामान्यांसाठी, ग्राहकांसाठी त्यांच्या हिताचा कायदा तयार व्हावा यासाठी  त्यांचे अथक कार्य केल्याचा उल्लेख आवर्जुन केला.

डॉ. बा. दा. जोशी यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न या कायद्याच्या मदतीने सोडविणे सोयीचे झाले असल्याची माहिती दिली. अरविंद बिडवई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्‍हा संघटक इंजि बालाजी लांडगे यांनी जिल्ह्यातील ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राची माहिती देऊन पीडित अर्जदार ग्राहकांना या करोना महामारीच्या काळात सुद्धा मार्गदर्शन केल्याची माहिती दिली. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government needs to take drastic steps to implement the decision given by the Consumer Commission Deosarkar nanded news