esakal | शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : अशोक चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक चव्हाण

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : अशोक चव्हाण

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (जि.नांदेड) : जिल्ह्यातील ३५ मंडळांत अतिवृष्टी झाली असून पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता.दहा) अर्धापूर (Ardhapur) तालुक्यातील शेतकऱ्यांना दिला. तालुक्यात झालेल्या संतधार पावसामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले असून हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून‌ नेला आहे. तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करून पालकमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून दिलासा दिला. तालुक्यात मुसळधार पावसामुळे खरिपाच्या पिकांचे (Kharip Crops) मोठे नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली व शेती खरडून गेली आहे. शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेही वाचा: भोकरदन पंचायत समितीच्या महिला सदस्याची गळफास घेऊन आत्महत्या

श्री.चव्हाण यांनी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव, सांगवी, सावरगाव मेंढला,. देगाव, शैलगाव, खडकी आदी गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यानी आपल्या व्यथा मांडून तातडीने मदत देण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सुजित नरहरे, गटविकास अधिकारी मिना रावतळे, मारोतराव जगताप, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, गणपतराव तिडके, संजय देशमुख लहानकर, तालुक्याध्यक्ष बालाजी गव्हाने, पप्पू पाटील कोंढेकर, शहराध्यक्ष राजु शेटे, प्रवीण देशमुख, नासेर खान पठाण, आनंद कपाटे, संजय लोणे, डॉ विशाल लंगडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कर्ज कसे फिटणार या चिंतेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सिनगारे कुटुंबांचे केले सांत्वन

शहरातील फुलेनगरातील काँग्रसचे माजी सरपंच गोविंद सिनगारे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन करून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच या संकटात आम्ही खंबीरपणे पाठीशी उभे आहो.त काही काळजी करू नका, अशी ग्वाही दिली. यावेळी विठ्ठल सिनगारे, वैष्णवी सिगारे, वैशाली सिनगारे, सोनाजी राऊत, प्रल्हाद सोळंके, विश्वंभर गोरे पंडित लगडे, व्यंकटी साखरे, डॉ.उत्तम इंगळे, माजी सभापती जाधव आदी उपस्थित होते.

loading image
go to top