esakal | ग्रामपंचायत निवडणूक वाद पेटला : नायगावच्या मेळगाव येथे दोन गटात हाणामारी; 21 जणांवर गुन्हे दाखल

बोलून बातमी शोधा

क्राईम न्यूज
ग्रामपंचायत निवडणूक वाद पेटला : नायगावच्या मेळगाव येथे दोन गटात हाणामारी; 21 जणांवर गुन्हे दाखल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बरबडा ( जिल्हा नांदेड ) : नायगाव तालुक्यातील कुंटुर पोलिस ठाण्या अंतर्गत मेळगाव येथील ग्रामपंचायत निवडणूकीनंतर उफाळलेल्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात एकमेकांना लाथा- बुक्यांनी व काठीने मारहाण केल्याने अनेक जण जखमी झाले. या प्रकरणी दोन्ही बाजूकडील एकवीस जणांवर परस्परविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हा वाद ता. २१ एप्रील रोजी घडला होता.

यामध्ये मुख्य आरोपी हे मेळगाव येथील पोलिस पाटील असल्याने परिसरातील एकच खळबळ माजली असून शासकीय सेवेत असून पोलिस व जनतेचे रक्षण करण्यासाठी गावपातळीवर निवड झालेल्या पोलिस पाटलाने गावांमध्ये भांडण लावल्याची चर्चा गावातील महिला व पुरुषांनी सांगितले आहे. पोलिस पाटील हनमंत शिंदे गावातील भांडण तंटे सोडवणे, गावातील नागरिकांनी रक्षण करण्यासाठी शासनाने पोलिस पाटील यांची निवड करण्यात आली मात्र या घटनेत मुख्य आरोपीच व त्याची दोन मुल, भाऊ यांनी मिळुन सदर लोकांना मारहाण केली असल्याचे पुरावे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर गैर कायद्याची मंडळी जमवून दंगा व ईतर असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - जागतीक पुस्तक दिन : पाचवीतील 'गौतमच्या कविता' आणि ५० हजारांचे बक्षीस!

ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद पेटला

सदर भांडणांचे मूळ कारण म्हणजे निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक 2021 मध्ये मेळगाव येथील एका गटाचे तीन उमेदवार व दुसऱ्या गटाचे तीन उमेदवार निवडून आले होते. यामध्ये दोन उमेदवारांना समान मते पडल्याने टाॅस करुन निवडून आलेल्या उमेदवारांच्या ताब्यात ग्रामपंचायत गेली. मात्र पडलेल्या उमेदवारांनी निवडून आलेल्या उमेदवाराच्या निवडणूक फार्माची चौकशी लावली. त्यामध्ये अतिक्रमण, शौचालय नसल्याचे मुद्दा उपस्थित झाला असून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी पंचायत समिती येथून गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विस्ताराधिकारी यांना पाठवून दिले. त्यावेळी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी गावात येऊन चौकशी करत असताना उमेदवाराच्या घरा समोरील रस्त्यावर आलेल्या पायऱ्या तोडून टाकल्याचे सदर दिसून आल्याने उमेदवाराला विचारणा केली असता मी अतिक्रमण केले नाही सर हे काढले आहे. असं दाखवल्यानंतर मनात राग धरुन माझ्या विषयी तक्रार दिली म्हणून निवडून आलेल्या उमेदवाराने सदर गैरकायद्याची मंडळी जमवून एकमेकाविरुद्ध मारहाण झाली. त्या मारहाणीमध्ये एकूण एका गटाची 10 व दुसऱ्या गटाची 11 अशा 21 लोकांवर गुन्हे दाखल करुन संबंधितांना न्यायालयात हजर करण्यात आली आहे अशी माहिती कुंटुर ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक करीमखाँ पठाण यांनी दिली.

हे आहेत आरोपी

एका गुन्ह्यातील प्रदिप माधव धसाडे यांच्या फिर्यादीवरुन विनोद आनंदराव शिंदे, मोहन दत्तराव शिंदे, दत्ता रामराव शिंदे, संतोष रामराव उर्फ राजाराम शिंदे, आनंदा नागोराव शिंदे, उद्धव देवदास नरवाडे, गणेश उर्फ बाळू मारोती शिंदे, शिवाजी रामराव नरवाडे व इतर दोन अशा आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच दुसऱ्या गटाच्या गुन्ह्यांमध्ये विनोद आनंदराव शिंदे यांच्या फिर्यादीवरुन हनुमंत नारायण शिंदे, प्रदीप माधव धसाडे, ज्ञानेश्वर हनुमंत शिंदे, दत्ता हनुमंत शिंदे, माधव नागोराव धसाडे, उद्धव दिगंबर धसाडे, वैजनाथ नारायण शिंदे, सुनील धसाडे, संदीप दिगंबर धसाडे, अविनाश व्यंकटराव शिंदे अशा अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

संपादन- प्रल्हाद कांबळे