नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, रक्तदान शिबीराचेही आयोजन 

प्रमोद चौधरी
Sunday, 6 December 2020

नांदेड रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ अनुयायांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत अभिवादन केले. दरवर्षीपेक्षा यंदा अनुयायांची गर्दी कमीच होती.  

नांदेड :  भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी (ता.सहा) रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. दरम्यान कोरोना पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून अनुयायांनी अभिवादन केले. शिवाय शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करत अनेक अनुयायांनी घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनानिमित्त रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांची प्रचंड गर्दी असते. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे ही गर्दी रविवारी दिसून आली नाही.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांतील अंधार संपणार

रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये विविध संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होवून युवकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदानाद्वारे डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. 

भाजपच्या वतीने रक्तदान शिबीर
रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ भाजप महानगरतर्फे अभिवादन केले. यावेळी प्रवीण साले मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले.  महानगराध्यक्ष प्रवीण साले, अॅड. दिलीप ठाकूर, व्यंकटेश लोणे, आरती पुरंदरे, संयोजक कुणाल गजभारे, अनिल हजारी, राज यादव, मारोती वाघ, शीतल खांडील, दिलीपसिंघ सोडी, नगरसेविका बेी गोपीले, जनार्दन गोपीले, महादेवी मठपती, सिद्धार्थ धुतराज, विशाल शुक्ला, रुपेश व्यास, सुरेश निल्लावार, मनोज जाधव, शाहु महाराज आदी उपस्थित होते.  

हे देखील वाचाच - मेडीकल कॉलेजसाठी आता ताकदीनिशी संघर्ष, परभणीकर संघर्ष समितीच्या पहिल्याच बैठकीत निर्णय
 
‘लसाकम’च्या वतीने अभिवादन
रेल्वे स्थानक परिसरामध्ये लसाकमचे प्रदेशाध्यक्ष बालाजी थोटवे, मराठवाडा सचिव निरंजन तपासकर, जिल्हाध्यक्ष प्रा. सी. एल. कदम, संजय मोरे, प्रा शिवाजी सूर्यवंशी, माधव कांबळे, श्री. जांबळीकर, डी. डी. गायकवाड, बालाप्रसाद भालेराव, प्रा. डॉ. संजय कसाब, श्री. टाकळीकर आदी उपस्थित होते.
 
वंचित बहुजन आघाडी
युवाआघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, गोविंद दळवी, जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले, शिवा नरंगले, श्याम कांबळे, विठ्ठल गायकवाड, साहेबराव बेले, दैवशाला पांचाळ, कैलाश वाघमारे, केशव कांबळे, देवानंद सरोदे, दीपक कसबे, श्री. बत्तलवाड आदी उपस्थित होते.

येथे क्लिक कराच - अल्प कापूस उत्पादन अन् बाजारपेठेत मिळेना भाव 
 
प्रजासत्ताक पक्ष
सुरेशदादा गायकवाड, देविदास मनोहरे, डी. पी. गायकवाड, एम. जी. बद्दलगावकर, पी. एस. गवळे, जे. डी. कवडे, नंदकुमार बनसोडे, प्रकाश लांडगे, संजय नरवाडे, रवी गायकवाड, शीलरत्न चावरे, शंकरराव एडगे, भगवान गायकवाड, किशोर अटकोरे, विजय गोडबोले, जनार्धन जमदाडे, बालाजी मोरे, धर्मेंद्र कांबळे, दत्ता व्यवहारे, नामदेव महिंद्रकर, बापूराव कांबळे, दयानंद वाघमारे, कपील वावळे, सीताराम सोनटक्के, चंद्रकांत भालेराव, सोमनाथ चौरंगे, राहुल गायकवाड, विकास इंगोले, विकास गजभारे, राजू कदम आदी उपस्थित होते.
 
बहुजन समाज पक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन करून रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव दिगंबर ढोले, जिल्हाध्यक्ष मनिष कावळे, महासचिव प्रा. डॉ. आनंद भालेराव, प्रभारी सुनील डोंगरे, सखाराम इंगोले, महिला आघाडीच्या शोभा कोकरे, भन्तेजी लोकनाथ, वनमाला कांबळे, जयवंत थोरात, भीमराव सातोरे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Greetings To Dr Babasaheb Ambedkar Blood Donation Camp Also Organized Nanded News