esakal | पालकमंत्री अशोक चव्हाण या दोन आमदारांसह मुंबईला रवाना 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

 जिल्ह्यातील दोन आमदारांसह ट्रुजेट विमानाने मुंबईला रवाना झाले. ते दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी  जिल्हा प्रशासनाला कोरोनासंदर्भात योग्य त्या सुचना दिल्या.

पालकमंत्री अशोक चव्हाण या दोन आमदारांसह मुंबईला रवाना 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण मंगळवारी (ता. २१) सकाळी दहा वाजता  जिल्ह्यातील दोन आमदारांसह ट्रुजेट विमानाने मुंबईला रवाना झाले. ते दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी  जिल्हा प्रशासनाला कोरोनासंदर्भात योग्य त्या सुचना दिल्या. 

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा विळखा वाढत असल्याने त्यांनी आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी पाउले उचलली आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यासोबत बैठका घेतल्या. जिल्ह्यातील अनेक ग्रामीन रस्त्याचे रुपांतर जिल्हा मार्गात केले. त्यामुळे जिल्ह्यातील दळणवळणाशी  जिल्हा ते ग्रामिण असा मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच शहरातील आरोग्य सेवेवर विशेष लक्ष देण्याचे जिल्हाधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी अनेक मार्गाने जिल्ह्यात मोठा निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच त्यांच्या प्रयत्नाने सायबर व डीएनए चाचणी विभागाला जागा मिळणार आहे. हा विभाग मागील अनेक दिवसांपासून मंजूर होऊनही जागेअभावी रखडत पडला होता. मात्र अशोक    चव्हाण यांनी कै. डाॅ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात या दोन्ही महत्वाच्या विभागाला जागा उपलब्ध करुन दिली आहे. 

हेही वाचा - लेंडी प्रकल्पाचे खरे जनक देवेंद्र फडणवीस- कोण म्हणाले वाचा...?

कोरोनाचा अहवाल वेळेत व अचुक देण्याचा प्रयत्न करा

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीचा वापर केला जात असतांनाही बाधीत रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र दिसत आहे. संशयितांची ताताडीने तपासणी करुन त्याच्या आजाराचे निदान लवकर व्हावे व त्याला उपचार वेळेत मिळावा म्हणून नव्याने मुंबई, पुणे, औरंगाबाद नंतर आथा नांदेडमध्येही अॅन्टीजेन रॅपीड टेस्टद्वारे तपासणी करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आरटीपीसीआर आणि रॅपीड टेस्टद्वारे जिल्ह्यातील कोरोना संशयितांना तपासणीसाठी आथा ताटकळत बसावे लागत नाही. आरोग्य विभागाकाडून दररोज कोरोना अहवाल     प्रसिद्ध देताना अनेक चुका होत असल्याने नागरिक भयभीत होत आहेत. त्यासाठी या विभागाला जबाबदारीने काम करण्याच्या सुचना दिल्या. नागरिक भयभीत होत कामा नये असे अहवाल वेळेत व अचुक देण्याचा प्रयत्न करा. 

आमदार अमरनाथ राजूरकर मुंबईला उपचारासाठी रवाना

कोरोना व जिल्हा विकासाचा आढावा घेऊन अशोक चव्हाण मंगळवारी मुंबईकडे रवाना झाले. सकाळी दहा वाजता श्री.गुरु गोविंदसिंग विमानतळावरुन हैद्राबाद -नांदेड- मुंबई या ट्रुजेट कंपनीच्या विमानाने गेले. यावेळी त्यांच्यासमवेत नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे आणि नांदेड उत्तरचे बालाजी   कल्याणकर हे सोबत होते. अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आमदार अमरनाथ राजूरकर यांना कोरोनाची बाधा झाल्याने  त्यांना रुग्णवाहिकेद्वारे मुंबईला येण्याच्या सुचना दिल्या. सकाळी अमरनाथ राजूरकर हे आपल्या दहा वर्षीय कोरोना बाधीत मुलीला सोबत घेऊन          मुंबईला रवाना झाले आहेत.  


 

loading image